अतिवृष्टीग्रस्तांसाठी महत्त्वाची सूचना; पंचनाम्यासाठी नगरपरिषदेचे पथक आजपासून प्रभाग १७ मध्ये
1 min read

अतिवृष्टीग्रस्तांसाठी महत्त्वाची सूचना; पंचनाम्यासाठी नगरपरिषदेचे पथक आजपासून प्रभाग १७ मध्ये

Loading

अतिवृष्टीग्रस्तांसाठी महत्त्वाची सूचना; पंचनाम्यासाठी नगरपरिषदेचे पथक आजपासून प्रभाग १७ मध्ये

नुकसानग्रस्तांनी आवश्यक कागदपत्रांसह सहकार्य करण्याचे आवाहन; मदत मिळण्यासाठी अचूक पंचनामा महत्त्वाचा

अमळनेर :
३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रभाग क्रमांक १७ मधील अनेक घरांचे, दुकाने तसेच धान्य, कपडे व इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर नगरपरिषदेच्या संबंधित विभागातील नियुक्त कर्मचारी आजपासून प्रभागात येऊन नुकसानग्रस्त मालमत्तांचे पंचनामे करणार आहेत.

ज्या नागरिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे, त्यांनी पंचनामा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पंचनाम्यावेळी कुटुंब प्रमुखाच्या आधारकार्डाची झेरॉक्स, बँक पासबुकाची झेरॉक्स तसेच नुकसानीची सविस्तर माहिती उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून अचूक पंचनामा होऊन शासनाकडे तातडीने अहवाल सादर करता येईल.

अचूक व वेळेत पंचनामा झाल्यास पात्र नुकसानग्रस्तांना शासनाची मदत लवकर मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पंचनाम्याबाबत कोणतीही अडचण अथवा समस्या असल्यास नगरसेविका सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांच्याशी मो. ९५७९६२३९२३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *