अष्टपैलू, पुरोगामी व विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व — डी. ए. सोनवणे सर
![]()
अष्टपैलू, पुरोगामी व विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व — डी. एस. सोनवणे सर
जीवनामध्ये असंख्य माणसे भेटत असतात. मोजकेच माणसे आपल्या हृदयावर कायमचे अस्तित्व निर्माण होऊन जातात. त्यापैकी आमचे प्रिय मित्र डी ए सोनवणे सर अष्टपैलू व्यक्तिमत्व होय. पातोंडा हया उपक्रमशील गावामध्ये दंगलदास सोनवणे यांचा जन्म झाला. लहानपणापासून अतिशय होतकरू, मेहनती व जिद्द असलेला तरुण शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेऊन प्रताप महाविद्यालयातून बी .ए ला सर्वप्रथम आले.वडिल आधार सोनवणे यांनी परिवारातील मुलां मुलींना शिकवण्यासाठी कष्ट घेतले.आई दगूबाई प्रेमळ,सद्विचारी मातृहृदयी असल्याने संपूर्ण परिवाराला नैतिकतेचे शिक्षण मिळाले. धनाजी नाना येथे आपली व्यावसायिक पात्रता दंगलदास सोनवणे सरांनी वाढवली. अमळनेर इंदिरा गांधी शाळेमध्ये रुजू झाले. परिस्थिती अगदी बेताची तसेच परिवार मोठा त्यामुळे काम करून शिक्षण घ्यावे लागले. आपल्याला ज्या लोकांनी शिक्षक म्हणून नोकरी दिली त्या शाळेची प्रामाणिकपणे सेवा करावी व मुलांना उत्तम विद्या घडवावे म्हणून सेवा समाप्ती पर्यंत झटत राहिले. डी .ए .सोनवणे आणि उपक्रम हे एकमेकाला जुळलेले समीकरण होते. मुलांच्या भाव विश्वात रममान होणारा हाडाचा शिक्षक म्हणजे डी .एस सोनवणे सर.. त्यांचे नाव दंगलदास आहे. परंतु कोणत्याही प्रकारचे अनिष्ट दंगल त्यांनी घडविले नाही परंतु वैचारिक दंगल घडवणारे विद्रोही मात्र नक्की आहे. नीतिमत्तेला जे आवडेल ते त्यांनी आयुष्यभर स्वीकारले. कुटुंबापेक्षा सामाजिक कार्यासाठी वाहून घेणारा कार्यकर्ता म्हणून दंगलदास सोनवणे लोकांच्या कायम स्मरणात आहे. कोणतेही शैक्षणिक प्रशिक्षण असो त्यामध्ये स्वतःहून तज्ञ मार्गदर्शक म्हणून भाग घेणारे उपक्रमशील शिक्षक म्हणून ते सर्व शिक्षकांमध्ये ज्ञात आहे. त्यांचा बाहुल्यांचा प्रयोग, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे हा त्यांचा छंद आहे. व्यक्तिमत्व तसे बहुआयामी आहे. व्यक्तिमत्वामध्ये पुरोगामित्वाची धार आहे. शुद्ध आचरण व सेवा करणारा परमार्थ त्यांना आवडतो. कर्मकांडाला विरोध करणारे परंतु चांगल्या कामासाठी धावून जाणारे व्यक्तिमत्व होय. कुणावरही अन्याय होणार नाही याची कायम दक्षता त्यांनी घेतलेली आहे. एखाद्या व्यक्तीला स्वतःहून मदत करण्याचे धाडस त्यांनी वेळोवेळी केलेले आहे.रोखठोक व प्रामाणिक विचार हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. मित्र दुनियेतील राजा माणूस सर आहेत. आपल्या बोलल्याने दुसऱ्याचे तात्काळ मन जिंकणारा मनोवेधक शिक्षक म्हणजे डी .ए. सोनवणे सर..
शाळेच्या कामासाठी घरचे काम बाजूला ठेवणारा कर्म कुशल शिक्षक सोनवणे सर आहेत. मित्रांना कायम हसवून त्यांच्या दुकाना विसर पाडणारा शब्दवेडा माणूस म्हणजे डी.ए.सोनवणे सर होय. सामाजिक कामामध्ये कधीही मागे न हटणारे व्यक्तिमत्व होय. इंदिरा गांधी हायस्कूल येथे महापुरुषांच्या जयंती त्याचप्रमाणे विविध उपक्रम राबवून त्यांनी संस्थेच्या संचालकात मानाचे स्थान मिळवलेले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन या कार्यामध्ये त्यांनी बरेच वर्ष काम केलेले आहे. साधना मासिक चालवण्यासाठी त्यांचे योगदान अनमोल आहे. साक्षरता अभियान उपक्रमात प्रत्यक्ष प्रौढांना शिकवून त्यांनी निरक्षराच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. साने गुरुजी कथामाला या उपक्रमात बऱ्याच ठिकाणी साने गुरुजींच्या कथा सांगून उद्बोधन केलेले आहे. संत रविदास महाराजांचे विचार समाजात रुजवण्यासाठी प्रयत्न केले आहे. पुरोगामी चळवळीमध्ये त्यांचे योगदान अप्रतिम ठरलेले आहे. शुद्ध मनाने अनेक लोकांची मने जिंकणारा अवलिया व्यक्तिमत्व सरांचे आहे. विविध ठिकाणी जाऊन आपल्या शाळेसाठी काय नवीन उपक्रम करता येईल याचा ध्यास त्यांना सदैव असायचा.. सर उत्कृष्ट कवी पण आहेत.. त्यांनी स्वतः तयार केलेल्या अनेक कविता आहेत. अनेक शिक्षक प्रशिक्षणात त्यांनी आपल्या कवितेचे सादरीकरण केलेले आहे.
स्वाभिमानाने जीवन जगणे हे त्यांच्या जीवनाचे ब्रीद आहे. लाचारी न करता आपल्या कर्तृत्वाने समाजाची मने जिंकावी हा त्यांचा ध्यास आहे. सतत नवनवीन शिक्षणाची आवड त्यांच्या मनात सदैव असते. संत रविदास मंडळ यांचे ते सक्रिय कार्यकर्ता आहे. मंगळ ग्रह मंदिर या सेवाभावी मंदिरासाठी निस्वार्थ सेवा ते देत असतात. आपल्यातील विनोदी शैलीने दुसऱ्याच्या मनावर राज्य करतात. अध्यात्मिक गोष्टींमध्ये त्यांना सेवा देण्याची आवड आहे. विद्यार्थ्यांसाठी कायम धडपड राहण्याचे काम त्यांनी केलेले आहे. आता नुकतेच त्यांची शिक्षकी पेशातील सेवा समाप्त होत आहे. परंतु अजून कोणालाही वाटत नाही की सोनवणे सर सेवा समाप्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. चांगल्या कामासाठी तन-मन-धन देणारा शिक्षक म्हणून त्यांची गणना होते. प्रोटॉन संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी त्यांनी उत्कृष्ट काम केलेले आहे. त्यांच्या संसार वृक्षाच्या वेलीवर दोन फुले उमललेले आहे. त्यांची सहचारिणी सुशीला सोनवणे ह्या मनमिळावू शिक्षिका आहेत. त्यांनी आपल्या धन्याच्या प्रत्येक कामात सहकार्य केलेला आहे. फुले शाहू आंबेडकर या विचाराच्या संघटनांमध्ये प्रत्यक्ष सहभाग म्हणून योगदान दिलेले आहे. निसर्गाप्रती जागृत असलेला त्यांचा परिवार आहे. आदरणीय सोनवणे सरांना अनेक पुरस्कार मिळालेले आहे. त्यामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार , उपक्रमशील शिक्षक पुरस्कार, महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार, समता शिक्षक संघटनेचा महात्मा फुले शिक्षक पुरस्कार, ओबीसी शिक्षक परिषदेचा जिल्हास्तरीय पुरस्कार मिळालेला आहे, हिंदी मंडळाचा उत्कृष्ट हिंदी सेवा दिल्याबद्दल चा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे . असंख्य मित्रपरिवार त्यांनी जोडून ठेवलेला आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये हिररीने ते भाग घेतात. सत्यशोधक विचाराचा वैचारिक वारसा ते जपत आहे प्रयत्न वादाची कास धरण्याची त्यांची सवय त्रिकाल बाधित आहे. अमळनेर येथील ओबीसी शिक्षक पालक विद्यार्थी संघ संघटनेत कधीपासून सक्रिय कार्यरत आहेत. प्रत्येक उपक्रमात त्यांनी खूप चांगले योगदान दिलेले आहे. महिला संघटन वाढवण्याचे प्रयत्न त्यांचे सतत चालू असतात. बुवाबाजी यांच्याविरुद्ध लिखाण ते करीत असतात. सर्वांना घेऊन चालणारा, सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारा निराळा शिक्षक म्हणजे सोनवणे सर होत. अगदी पारदर्शक विचार व कृती करणारा विद्यार्थी प्रिय शिक्षक सोनवणे सर आहेत. त्यांनी केलेल्या असंख्य कामाची पावती त्यांना वेळोवेळी मिळालेली आहे. एखाद्या कामासाठी वाहून घेताना त्यांनी वेळेचे भान ठेवले नाही. काम होईपर्यंत त्यांनी सतत प्रयत्न चालू ठेवलेले असतात. कोणत्याही कामासाठी कायम उत्साही असलेला शिक्षक ही प्रतिमा त्यांनी डागाळू दिली नाही. आपण सर्व निर्मिकाची लेकरे आहोत. आपल्यात कोणताच भेदभाव असता कामा नये हा विचार त्यांनी विद्यार्थ्यांना अध्यापनात दिला. अशा या शिक्षकाची अध्यापनाची भूमिका निहित वयोमानामुळे थांबणार आहे. परंतु ते सामाजिक व अध्यात्मिक कामासाठी सदैव आपल्या सोबत राहतील. सामाजिक कामासाठी त्यांना अधिकारी वेळ मिळेल..
त्यांच्या केलेल्या उज्वल शैक्षणिक, सामाजिक कार्याला सलाम आहे. त्यांचे भावी जीवन सुखी समृद्ध आनंदमय जावो ही सदिच्छा !!!…
एस.एच.भवरे

