पालखी सोहळ्यात सेवाभावाचा गारवा; राजे संभाजी-शिवशक्ती मित्रपरिवाराकडून भाविकांसाठी दूध व कोल्ड्रिंक्स वाटप!  , नगरसेवक पंकजभाऊ चौधरी मित्रपरिवाराचा उपक्रम; मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात शुभारंभ
1 min read

पालखी सोहळ्यात सेवाभावाचा गारवा; राजे संभाजी-शिवशक्ती मित्रपरिवाराकडून भाविकांसाठी दूध व कोल्ड्रिंक्स वाटप! , नगरसेवक पंकजभाऊ चौधरी मित्रपरिवाराचा उपक्रम; मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात शुभारंभ

Loading

पालखी सोहळ्यात सेवाभावाचा गारवा; राजे संभाजी-शिवशक्ती मित्रपरिवाराकडून भाविकांसाठी दूध व कोल्ड्रिंक्स वाटप!

नगरसेवक पंकजभाऊ चौधरी मित्रपरिवाराचा उपक्रम; मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात शुभारंभ

अमळनेर प्रतिनिधी
श्री सदगुरु सखाराम महाराज पालखी उत्सवाच्या पावन निमित्ताने भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. राजे संभाजी व शिवशक्ती मित्रपरिवार, तसेच नगरसेवक पंकजभाऊ चौधरी मित्रपरिवार यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेकरू भाविकांसाठी थंडगार दूध व कोल्ड्रिंक्सचे मोफत वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचा शुभारंभ शिवसेना गटनेते तथा नगरसेवक पंकज चौधरी, जेष्ठ व्यापारी टी. के. भदाणे आणि मनीषशेठ जोशी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. उन्हाच्या कडाक्यात थकलेल्या भाविकांसाठी हा उपक्रम अक्षरशः दिलासा देणारा ठरला.

सदर सेवाभावी उपक्रमाला मा. आमदार शिरीषदादा चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, जेष्ठ नगरसेवक दादा पवार, नगरसेवक महेशबापू देशमुख, शिक्षण सभापती नवीद शेख, बाळासाहेब संदानशिव, श्रीराम चौधरी आदी मान्यवरांनी भेट देत कौतुक केले.

पालखी सोहळ्याच्या निमित्ताने केवळ धार्मिक उत्साहच नव्हे, तर समाजसेवेची परंपरा जपणारा हा उपक्रम भाविकांच्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण करून गेला. “सेवेतूनच भक्तीचा खरा अर्थ उलगडतो,” याची प्रचिती या उपक्रमातून पुन्हा एकदा आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *