1 min read

विश्वासाला सन्मानाची जोड; काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भव्य गौरव , अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी स्टडी सेंटरतर्फे सत्कार; समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन

Loading

विश्वासाला सन्मानाची जोड; काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भव्य गौरव

अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी स्टडी सेंटरतर्फे सत्कार; समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन

अमळनेर, प्रतिनिधी : अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहे.) स्टडी सेंटर अँड पब्लिक लाइब्रेरी, अमळनेर यांच्या वतीने काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त पदाधिकारी ऍड. अ.रज्जाक शेख , सईद तेली आणि राजू भट यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
शहर काँग्रेस कमिटीचे निष्ठावंत कार्यकर्ते ऍड.अ.रज्जाक शेख आणि सईद सत्तार तेली,यांची जळगाव जिल्हा काँग्रेस चिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल, तसेच राजू भट यांची काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व युवा कल्याण प्रतिष्ठाणचे अध्यक्ष:प्रा.अशोक पवार सर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून अध्यक्ष कांग्रेस सेवा दल भागवत आण्णा गुरूजी, सोमचंद संदानशिव, हाजी शेखा मिस्तरी, शब्बीर पहलवान आणि आमिर खॉ मिस्री,हाजी ताहेर शेख,साबीर पठाण,जहुर मुतवल्ली,उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रियाज मौलाना यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाहरुख सिंगर आणि पत्रकार मुन्ना शेख यांनी देशभक्तीपर गीत सादर करून वातावरण भारावून टाकले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. अशोक पवार यांनी नव्या पदाधिकाऱ्यांनी समाजहित व जनसेवेचे कार्य अधिक जोमाने करावे, असे आवाहन केले. भागवत गुरूजी यांनीही आपल्या मनोगतात सामाजिक सलोखा आणि लोकसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. सत्कारमूर्ती ऍड.अ. रज्जाक शेख यांनी मिळालेल्या सन्मानाबद्दल आयोजकांचे आभार मानत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची ग्वाही दिली.
यावेळी पी वाय पाटील, रविन्द्र पाटील ,शकील सेठ, हाजी रज्जू शेख, गयास अहेलेकार,रुकनोद्दीन अहलेकर,मनसुर सेठ,जाकिर भाई रद्दी वाले, रहीम तेली, अमजद अली शाह, अशफाक शेख,अनीस सर, मुजीब भाई, अजीज भाई,समु भाई वायरमैन,फारुख खाटीक, शब्बीर भाई,अ.रहेमान,जाकीर मिस्री, अकबर सेठ, दिलावर काझी, ज़ावेद पटवे, फिरोज शेख गॅस,आबीद शेख, हुजेफ शेख शेख,यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी स्टडी सेंटर अँड पब्लिक लाइब्रेरीच्या वतीने करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *