भडणेच्या शिरपेचात मानाचा तुरा! पोलीस पाटील युवराज माळी यांच्या उल्लेखनीय कार्याला मानाचा गौरव
1 min read

भडणेच्या शिरपेचात मानाचा तुरा! पोलीस पाटील युवराज माळी यांच्या उल्लेखनीय कार्याला मानाचा गौरव

Loading

भडणे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा,,,,,,
भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांचा उल्लेखनीय कामगिरी

शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील पोलीस पाटील युवराज मोहन माळी यांनी अवघ्या सात वर्षाच्या कालावधीत गावातील कायदा सुव्यवस्था तसेच आपल्या कार्य कुशल कामगिरीमुळे त्यांना आज पर्यंत पोलीस विभाग व महसूल विभागा तर्फे अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्या या उत्कृष्ट कामाची दखल उल्लेखनीय कामगिरीचा दैनिक सकाळ व साम टीव्ही मराठी ने धुळे येथील कृष्णा हॉटेलमध्ये सकाळ यशोगाथा या कार्यक्रमात प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी धुळे जिल्ह्याचे प्रभारी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक एस पी डॉ अजय देवरे माजी जी प उपाध्यक्ष माननीय सुभाष देवरे धुळे येथील उद्योगपती मा,भतवाल खानदेश सकाळ समूहाचे सचिन जोशी सर निखिल सूर्यवंशीसर व दैनिक सकाळचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते भडणे पोलीस पाटील युवराज माळी यांनी केलेल्या कामगिरीच्या गौरवा बद्दल पोलीस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे शिंदखेडा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे एपीआय हनुमंत गायकवाड दीपक ढोके पीएसआय किशोर जाधव जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील नरेंद्र शिंदे किशोर भदाणे विनय माळी भूषण बोरसे रविंद्र बेडसे डॉक्टर महेंद्र पाटील राजेंद्र पाटील शिवाजी पाटील माळी समाजाचे जेष्ठ नेते पांडुरंग माळी आदींनी अभिनंदन करून कौतुक केले
चौकट,,,,,,,
मला अवघ्या सात वर्षात माझ्या भडणेगावातील नागरीकांनी तसेच महसूल व गृह विभागाने वेळोवेळी केलेले मार्गदर्शन व केलेलं सुचनांचे पालणं व गावकऱ्यांच लाभलेले सहकार्य यामुळेच मला काम करण्याची स्फूर्ती मिळाली मिळालेला हा पुरस्कार सन्मान माझ्या गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला याचे मला समाधान वाटते
युवराज माळी भडने पोलीस पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *