“आकडेवारीतून घडणार विकासाचा आराखडा—अमळनेरमध्ये जनगणनेची दमदार तयारी!”, तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न; अचूक माहिती संकलनासाठी प्रशासनाचे काटेकोर नियोजन
1 min read

“आकडेवारीतून घडणार विकासाचा आराखडा—अमळनेरमध्ये जनगणनेची दमदार तयारी!”, तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न; अचूक माहिती संकलनासाठी प्रशासनाचे काटेकोर नियोजन

Loading

*जनगणनेच्या अचूकतेवर भर देऊन प्रक्रिया वेळेत पूर्ण करा*

भारत सरकारची 2017 ची महत्वपूर्ण जनगणना यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अमळनेर नगर परिषद प्रशासन सज्ज झाले आहे जनगणनेच्या कामासाठी प्रगणक आणि सुपरवायझर यांची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रगनाकांच्या कामावर सुपरवायझर पर्यवेक्षकाची भूमिका पार पडतील. या प्रक्रियेचा भाग म्हणून नुकतेच पहिल्या टप्प्याचे तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर सायरदेवी बोहरा स्कूल मंगरूळ येथे संपन्न झाले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश शिंदे, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र चव्हाण, जनगणना अधिकारी . रोहित रामोळे.. उपस्थित होते. फिल्ड ट्रेनर म्हणून डी. ए. धनगर, दिनेश निघोट, राहुल पाटील, धनश्री वानखेडे यांनी प्रशिक्षण काम पाहिले.
प्रशिक्षणा दरम्यान मार्गदर्शन करताना जनगणनेचे चार्ज ऑफिसर म्हणून गणेश शिंदे साहेब म्हटले की जनगणना ही केवळ आकडेवारी गोळा करणारी प्रक्रिया नसून ती देशाच्या विकास, नियोजन आणि आराखडा याचा पाया आहे. त्यामुळे प्रगणकांनी प्रत्येक माहिती अचूक जबाबदारीने सचोटीने संकलित करावी हीच या उपक्रमाची खरी यशस्वीता आहे.
देशाची जनगणना ही प्रत्येक नागरिकांसाठी एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. 2027 च्या जनगणने द्वारे लोकसंख्येची अचूक आकडेवारी सामाजिक आणि आर्थिक स्थिती तसेच पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला जाणार आहे. यातून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग करून सरकारी योजना शिक्षण आरोग्य आणि रोजगार निर्मितीसाठी करण्यात येत असल्याने नागरिकांनी या प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करून प्रगनकांना अचूक माहिती देणे अपेक्षित आहे. आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आणि नियोजनासाठी ही जनगणना अत्यंत मोलाची ठरणार आहे.
प्रशिक्षणार्थी प्रगणक गोपाल हडपे व खांजोळकर मॅडम ,……. मॅडम यांनी प्रतिनिधिक मनोगत व्यक्त करताना सांगितले की फिल्ड ट्रेनर्स कडून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल तसेच नगरपालिका प्रशासनाने पुरवलेल्या सोयी सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले.
देशात पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल मोडमध्ये जनगणना सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्यासाठी सरकारने हायटेक सिस्टीमचा अवलंब केला आहे. या जनगणनेत डेटा सुरक्षेवर व गोपनीयतेवर विशेष भर देण्यात येत आहे. ज्यामध्ये नो लोकल स्टोरेज पॉलिसी सर्वात महत्त्वाची आहे. जनगणना कर्मचारी घरोघरी जाऊन मोबाईल ॲप मध्ये ते ३३ मुद्द्यांवर माहिती नोंदवतील. डेटा कोणत्याही दुसऱ्या मोबाईल किंवा डिवाइस मध्ये मॅन्युअली ट्रान्सफर करण्याचा पर्याय नसेल. डेटा एन्ट्री दरम्यान इंटरनेट बंद राहील आणि जसे नेटवर्क ऑन होईल तशी माहिती आपोआप सुपरवायझर च्या मोबाईल मध्ये ट्रान्सफर होऊन कर्मचाऱ्यांच्या फोन मधून डिलीट होऊ शकते. त्याच पद्धतीने प्रत्येक पुढच्या टप्प्यावर माहितीचे आदान प्रदान होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाचा डाटा अत्यंत सुरक्षित आणि गोपनीय असणार याची खात्री बाळगावी. अशा पद्धतीची साधक-बाधक चर्चा प्रशिक्षणात झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव ठाकरे यांनी तर आभार राहुल पाटील यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगरपालिकेचे अरविंद चव्हाण सर, रोहित रामोळे सर, संतोष केदारे, संदीप संदानशिव जगदीश बिराडे गीतांजली घोरपडे, मनोज पाटील ,पुजा सरनाईक मॅडम,बापूराव ठाकरे, महेंद्र रामोशे गोपाल हडपे योगेश्री पाटील,सुवर्णा पाटील,ललिता घ्यार,विजय निकम , प्रतिक्षा गोसावी, नितीन पाटील, गौरव पाटील मनीषा पवार
……. यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *