राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अमळनेर शहराध्यक्षपदी चेतन राजपुत
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अमळनेर शहराध्यक्षपदी चेतन राजपुत
अमळनेर:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)च्या अमळनेर शहराध्यक्षपदी चेतन देवसिंग राजपुत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री व आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शिफारशीनुसार जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी त्यांची नियुक्ती केली असून याबाबतचे नियुक्ती पत्र अमळनेर येथे नुकत्याच पार पडलेल्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या उपस्थितीत त्यांना प्रदान करण्यात आले.
गेल्या 10 वर्षांपासून शहराध्यक्ष पदावर असणारे मुक्तार खाटीक यांनी राजीखुषीने पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.या रिक्त पदावर तरुण चेहरा म्हणून चेतन राजपुत यांना स्थान देण्यात आले आहे.राजपूत हे विद्यार्थी दशेपासून सामाजिक व राजकीय वर्तुळात सक्रिय असून पत्रकारितेच्या माध्यमातून देखील उत्तम जनसंपर्क त्यांचा आहे. न्यू प्लॉट परिसर विकास मंचचे अध्यक्ष व राजपूत एकता मंचचे संचालक ते आहेत.शहरात उत्तम संघटन असल्याने त्यांच्यावर शहराध्यक्ष पदाची जवाबदारी सोपविण्यात आली असून सदर नियुक्ती बद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

