३० एप्रिल २०२६ रोजी आ. योगेश टिळेकर यांचा धुळे दौरा; माळी समाज बैठकींचे आयोजन
1 min read

३० एप्रिल २०२६ रोजी आ. योगेश टिळेकर यांचा धुळे दौरा; माळी समाज बैठकींचे आयोजन

Loading

 

३० एप्रिल २०२६ रोजी आ. योगेश टिळेकर यांचा धुळे दौरा; माळी समाज बैठकींचे आयोजन

धुळे प्रतिनिधी :(काशिनाथ माळी)
महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सदस्य तसेच भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा. आमदार योगेश आण्णा टिळेकर यांचा धुळे जिल्हा दौरा दि. ३० एप्रिल २०२६ (गुरुवार) रोजी आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यादरम्यान माळी समाजाच्या विविध ठिकाणी बैठका होणार असून, समाज बांधवांशी थेट संवाद साधला जाणार आहे.

दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून,
सकाळी ११.०० वाजता सोनगीर येथील माळी समाज मंगल कार्यालयात पहिली बैठक पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी २.०० वाजता शिंदखेडा तालुक्यातील मढी येथे दुसरी बैठक होईल. तसेच सायंकाळी ४.०० वाजता धुळे (देवपूर) येथे डॉ. सुशील महाजन यांच्या संपर्क कार्यालयात तिसरी व महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकींच्या माध्यमातून माळी समाजातील विविध प्रश्न, विकासाचे मुद्दे, शैक्षणिक व सामाजिक प्रगती याबाबत चर्चा होणार असून, समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने सोनगीर परिसरातील समाज बांधवांनी सोनगीर येथे, शिंदखेडा तालुक्यातील बांधवांनी मढी येथे, तसेच धुळे शहर व परिसरातील माळी समाज बांधवांनी देवपूर येथील बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या दौऱ्याच्या आयोजनासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री बापूसाहेब खलाणे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री आर. के. माळी (सोनगीर), डॉ. सुशील महाजन (प्रदेश कार्यकारिणी सदस्य), आप्पासाहेब हनुमंत वाडीले, श्री विलासराव पाटील (राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय माळी महासंघ), नगरसेवक श्री सुभाष जगताप, श्री ललित माळी, पैलवान मुन्नादादा वाडीले (भाजपा युवा आघाडी), श्री शंकरराव खलाणे (नेर), श्री अजय माळी (अकलाड), श्री भिला बारकू पाटील (शिंदखेडा), श्री प्रविण माळी (शिंदखेडा) तसेच श्री काशिनाथ माळी सर (उपजिल्हाध्यक्ष, भाजपा शिक्षक आघाडी) आदी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.
या दौऱ्यामुळे माळी समाजाच्या प्रश्नांना चालना मिळून संघटनात्मक बळकटी येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *