एन.एम.एम.एस.मध्ये डी.आर. कन्या शाळेचा झंकार; सहा विद्यार्थिनींचे मेरिटमध्ये दिमाखदार यश”
1 min read

एन.एम.एम.एस.मध्ये डी.आर. कन्या शाळेचा झंकार; सहा विद्यार्थिनींचे मेरिटमध्ये दिमाखदार यश”

Loading

 “एन.एम.एम.एस.मध्ये डी.आर. कन्या शाळेचा झंकार; सहा विद्यार्थिनींचे मेरिटमध्ये दिमाखदार यश”

अमळनेर :
अमळनेर येथील खा. शि. मं. संचलित द्रौपदी रा. (डी.आर.) कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय प्रज्ञा शोध (NMMS) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला आहे. या परीक्षेत विशेष गुणवत्तेसह तब्बल सहा विद्यार्थिनी मेरिट यादीत झळकल्या असून, त्यांच्या या यशाबद्दल शाळेत अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोक्षदा भुषण पाटील, मयुरी संदीप पाटील, ऐश्वर्या अजय पाटील, रोहिणी बाळू शिरसाठ, वैष्णवी महारू पाटील आणि केतकी पंकज देशपांडे या गुणवंत विद्यार्थिनींनी कठोर परिश्रम, सातत्य आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर हे यश मिळवले आहे.

या यशस्वी विद्यार्थिनींचा शाळेत विशेष सत्कार समारंभ आयोजित करून गौरव करण्यात आला. यावेळी शालेय समितीचे चेअरमन भाऊसाहेब जितेंद्रजी जैन यांच्या हस्ते विद्यार्थिनींना सन्मानचिन्ह व बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापिका श्रीमती एस. पी. बाविस्कर, पर्यवेक्षक श्री एस. पी. वाघ, जेष्ठ शिक्षक श्री एस. एस. माळी, श्री एस. एस. वाघ, जेष्ठ लिपिक श्री शाम पवार, श्री के. आर. बाविस्कर तसेच परीक्षेच्या प्रमुख श्रीमती तरन्नुम शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या उल्लेखनीय यशामुळे डी.आर. कन्या शाळेची शैक्षणिक परंपरा अधिक दृढ झाली असून, इतर विद्यार्थिनींसाठीही हे यश प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *