गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणूक’ : अ. भा. माळी महासंघाची जिल्हास्तरीय बैठक उत्साहात संपन्न , दहावी-बारावीसह पदवी, व्यावसायिक अभ्यासक्रम, एमपीएससी-यूपीएससी गुणवंतांचा तालुकानिहाय होणार गौरव; १९ जुलै स्थापना दिनही उत्साहात साजरा करण्याचे आवाहन
1 min read

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणूक’ : अ. भा. माळी महासंघाची जिल्हास्तरीय बैठक उत्साहात संपन्न , दहावी-बारावीसह पदवी, व्यावसायिक अभ्यासक्रम, एमपीएससी-यूपीएससी गुणवंतांचा तालुकानिहाय होणार गौरव; १९ जुलै स्थापना दिनही उत्साहात साजरा करण्याचे आवाहन

Loading

‘गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणूक’ : अ. भा. माळी महासंघाची जिल्हास्तरीय बैठक उत्साहात संपन्न

दहावी-बारावीसह पदवी, व्यावसायिक अभ्यासक्रम, एमपीएससी-यूपीएससी गुणवंतांचा तालुकानिहाय होणार गौरव; १९ जुलै स्थापना दिनही उत्साहात साजरा करण्याचे आवाहन

धुळे प्रतिनिधी-अखिल भारतीय माळी महासंघाच्या धुळे जिल्हा, धुळे महानगर व सर्व तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांची विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या नियोजनासंदर्भातील महत्त्वपूर्ण जिल्हास्तरीय बैठक डॉ. सुशील महाजन यांच्या जनसंपर्क कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विलासरावजी पाटील होते. बैठकीत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान अधिक व्यापक आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष श्री. वासुदेव देवरे, जिल्हाध्यक्ष श्री. आर. के. माळी, राष्ट्रीय अध्यक्षांचे सचिव श्री. काशिनाथ माळी, धुळे शहराध्यक्ष श्री. हरीशचंद्र रेंडे, महानगर सचिव श्री. ज्ञानेश्वर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष श्री. संतोष माळी (शिरपूर) तसेच सर्व तालुकाध्यक्ष, महानगर पदाधिकारी आणि महासंघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांनी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबाबत आपली मते मांडली. यावर्षी इयत्ता दहावीमध्ये ८५ टक्के व त्यापेक्षा अधिक, इयत्ता बारावीमध्ये ८० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी, तसेच बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., सीजीपीए पद्धतीतील पदवी अभ्यासक्रम, डिप्लोमा, आयटीआय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये ८० टक्के किंवा समतुल्य गुणवत्तेने उत्तीर्ण विद्यार्थी, तसेच एमपीएससी, यूपीएससी आणि विविध शासकीय व प्रतिष्ठित सेवांमध्ये निवड झालेल्या गुणवंतांचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. आर. के. माळी यांनी सांगितले की, “गावपातळीवरील गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना समाजाच्या व्यासपीठावर गौरविणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. समाजाकडून मिळणारी कौतुकाची थाप विद्यार्थ्यांना नव्या जोमाने प्रगती करण्यासाठी प्रेरणा देईल.”
प्रदेश उपाध्यक्ष श्री. वासुदेव देवरे यांनी कार्यक्रमाचे स्वागत करताना सर्व तालुक्यांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांची निवड पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विलासरावजी पाटील यांनी सांगितले की, “गेल्या १८ वर्षांपासून अखिल भारतीय माळी महासंघ सातत्याने विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करत आहे. गुणवंतांचा सन्मान ही समाजाच्या प्रगतीची प्रेरणादायी परंपरा असून ती अधिक भक्कम करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.”

यावेळी त्यांनी १९ जुलै हा अखिल भारतीय माळी महासंघाचा स्थापना दिन गाव, तालुका व जिल्हास्तरावर उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले. तसेच नाशिक येथील काशी मंगल कार्यालयात होणाऱ्या स्थापना दिन सोहळ्यास सर्व पदाधिकारी व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

तालुकानिहाय विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे वेळापत्रक

– शिरपूर तालुका : २ ऑगस्ट २०२६ (रविवार)
– धुळे तालुका व धुळे महानगर : ९ ऑगस्ट २०२६ (रविवार)
– साक्री तालुका (दहिवेल) : १६ ऑगस्ट २०२६ (रविवार)
– शिंदखेडा तालुका : ६ सप्टेंबर २०२६ (रविवार)

या सर्व कार्यक्रमांचे नियोजन सर्वानुमते निश्चित करण्यात आले. बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी अनेक सूचना मांडल्या.

बैठकीचा समारोप जिल्हाध्यक्ष श्री. आर. के. (दादा) माळी यांनी उपस्थितांचे आभार मानून केला. यावेळी श्री. कन्हैय्यालाल माळी (साक्री), श्री. सुनील महाजन (शिरपूर), श्री. रोकडे नाना, श्री. अनिल माळी, श्री. जिजाबराव माळी, श्री. प्रवीण महाजन (लामकानी), श्री. श्याम माळी (सोनगीर) यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. चहापानानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या महासंघाच्या या उपक्रमामुळे शैक्षणिक गुणवत्ता, स्पर्धात्मकता आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *