पुढील सर्व निवडणुका सोप्या करायच्या असतील तर मतदारयादी पुनरीक्षण मोहिमेकडे लक्ष द्या-आ.अनिल पाटील,  राष्ट्रवादी काँग्रेसचा बूथ कार्यकर्ता मेळावा उत्साहात
1 min read

पुढील सर्व निवडणुका सोप्या करायच्या असतील तर मतदारयादी पुनरीक्षण मोहिमेकडे लक्ष द्या-आ.अनिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचा बूथ कार्यकर्ता मेळावा उत्साहात

Loading

पुढील सर्व निवडणुका सोप्या करायच्या असतील तर मतदारयादी पुनरीक्षण मोहिमेकडे लक्ष द्या-आ.अनिल पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचा बूथ कार्यकर्ता मेळावा उत्साहात

अमळनेर प्रतिनिधी
-आपल्याला पुढील सर्व निवडणुका सोप्या करायच्या असतील तर मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम(SIR) वर काळजीने लक्ष द्या,या मोहिमेतून तयार होणाऱ्या मतदार याद्या म्हणजे पुढील 20 ते 25 वर्षाची सोय असून त्यासाठी आतापासूनच चौकस राहा असे आवाहन
माजी मंत्री तथा आ.अनिल भाईदास पाटील यांनी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी केले.
बन्सीलाल पॅलेस अमळनेर येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी शहर व ग्रामिण भागातील बूथ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुरवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी मार्गदर्शन करून
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेसाठी सर्वानी सज्ज व्हावे असे आवाहन केले.पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की निवडणूक आयोग दर काही वर्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी विशेष मोहीम राबवतो. त्याला SIR म्हणतात. यामध्ये 18 वर्षे पूर्ण झालेल्यांची नावं यादीत वाढवणे ,मृत व्यक्ती, स्थलांतरित झालेले मतदार काढून टाकणे,नाव, पत्ता, फोटो, वय यात चूक असेल तर दुरुस्त करणे,यासाठी BLO म्हणजे Booth Level Officer घरोघरी जाऊन माहिती तपासतात,थोडक्यात SIR म्हणजे मतदार यादीची विशेष साफसफाई आणि अपडेट मोहीम आहे. बूथ कार्यकर्त्यांनी एक लक्षात ठेवावे की माझं बूथ प्लस म्हणजे माझा आणि पक्षाचा विजय आहे,बुथच्या यशस्वी कार्यकर्त्याचीच पक्षात नोंद घेतली जात असते,आपल्या बूथ वर मिळालेले मतदान म्हणजेच राजकारणातले थर्मामीटर असून मतदार यादी राजकीय भवितव्याचा आत्मा असल्याने त्या किती सक्षम करायच्या ते बूथ कार्यकर्त्यांच्या हाती आहे.पालिका निवडणुकीत आपल्याला अपयश आले पण हरकत नाही आपल्याला आपल्या चुका कळल्यात,त्या दुरुस्त करण्याची संधी आपल्याकडे आहे.SIR मोहीम देखील आपल्यासाठी संधी असून मतदार यादी चे अवलोकन करून आपल्या भागातील बीएलओ बरोबर संपर्क वाढवा.येणाऱ्या काळात मॅपिंग द्वारे दुबार नावे कोणत्याही परिस्थितीत वगळले जातील,जवळपास 32 हजार नावे मतदारसंघातुन कमी होऊ शकतील. त्यासाठी बूथ रचना पक्की करा असे आवाहन करत येणाऱ्या काळात बूथ कार्यकर्त्याला थेट एन्ट्री हे धोरण उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार अवलंबविणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
सुरवातीला प्रास्तविक माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी तर जिल्हा प्रवक्ते योगेश देसले व तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मंचावर माजी नगराध्यक्षा सौ जयश्री अनिल पाटील, जेष्ठ नेत्या सौ तिलोत्तमा पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, नूतन शहराध्यक्ष चेतन राजपूत, मार्केट सभापती अशोक आधार पाटील, जितुभाऊ ठाकूर, महिला अध्यक्ष मंदाकिनी भामरे, युवक शहराध्यक्ष पंकज साळी, युवक ग्रामीण अध्यक्ष तारकेश्वर गांगुर्डे यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद कदम सर व आभार सुनील काटे यांनी मानले. मेळाव्यास बाजार समितीचे सर्व आजी माजी संचालक, माजी जि प व प स चे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, सरपंच, सोसायटी चेअरमन, कार्यकर्ते, पदाधिकारी, बूथ प्रमुख व बूथ सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व फ्रंटल पदाधिकारी, शाखा अध्यक्ष व शाखा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *