जागतिक पुस्तक दिनी अमळनेर फार्मसी कॉलेजमध्ये वाचनाचा जागर
![]()
जागतिक पुस्तक दिनी अमळनेर फार्मसी कॉलेजमध्ये वाचनाचा जागर
अमळनेर प्रतिनिधी
खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व.श्री.पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर या महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथालयात ग्रंथपाल श्री.सुजित अमळकर व शिवाजी पाटील यांच्या हस्ते पुस्तकांचे पुजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य प्रितम पाटील म्हणाले की, “पुस्तके ही केवळ कागदाची पाने नसून ती ज्ञानाचा जिवंत वारसा आहेत. आजच्या डिजिटल युगात माहिती सहज उपलब्ध असली, तरी वैचारिक प्रगल्भतेसाठी पुस्तकांचे वाचन करणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमाची पुस्तके न वाचता अवांतर वाचन करून आपले व्यक्तिमत्व समृद्ध करावे.”
यावेळी त्यांनी ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथांचे जतन आणि वाचन चळवळ अधिक व्यापक करण्यावर भर दिला.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता ग्रंथ प्रदर्शनाने करण्यात आली, ज्यामध्ये विविध विषयांवरील नामवंत लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे नियोजन प्रा. सतिष ब्राम्हणे यांनी केले.
पदवी, पदविका अभ्यासक्रमातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक खान्देश शिक्षण मंडळाचे फार्मसी विभागाचे चेअरमन मा.योगेशजी मुंदडे यांनी केले.

