शेळावे बु. मध्ये शिक्षणाचा जल्लोष; प्रवेशोत्सव व निरोप समारंभ दणक्यात
![]()
शेळावे बु. मध्ये शिक्षणाचा जल्लोष; प्रवेशोत्सव व निरोप समारंभ दणक्यात
पारोळा प्रतिनिधी
आज दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी शेळावे बु!! येथे शाळा प्रवेशोत्सव व इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भैय्यासो प्रवीण पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे शेळावे बु!! येथील सरपंच ताईसो. सुरेखा अरुण पाटील, शेळावे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सोमनाथ पाटील सर , पोलीस पाटील श्री राजेंद्र बिऱ्हाडे हे होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक श्रीमती योगिता सूर्यवंशी यांनी केले.
इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे पुष्प आणि चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. तसेच इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना पुष्प व पेन देऊन निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वेतेसाठी श्री नितीन भरोटे सर,श्रीमती गायत्री देसलेमॅडम,श्री सुनील बडगुजर सर श्री गोपाल महाजन सर यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल महाजन सर यांनी केले. आभार प्रदर्शन श्री बडगुजर सर यांनी केले.

