प्रा. मंदाकिनी भामरे यांची राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षपदी निवड
1 min read

प्रा. मंदाकिनी भामरे यांची राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षपदी निवड

Loading

 

प्रा. मंदाकिनी भामरे यांची राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षपदी निवड

विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या भामरे मॅडमवर मान्यवरांचा विश्वास; सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

अमळनेर (प्रतिनिधी) – प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील प्राध्यापिका तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या आदरणीय ताईसाहेब प्रा. मंदाकिनी नवल भामरे यांची राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे अमळनेर तालुक्याचा मान उंचावला असून सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रा. भामरे यांनी आपल्या कार्यकाळात अनेक जबाबदाऱ्या यशस्वीरित्या सांभाळल्या आहेत. त्या अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष, लोण चारम तांडा येथील माजी सरपंच, तसेच परमपूज्य साने गुरुजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पतपेढी, अमळनेर येथे माजी मानद सचिव व खजिनदार म्हणून कार्यरत होत्या. विविध सामाजिक उपक्रमांमधून त्यांनी महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि मानवाधिकार या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल आमदार अनिल पाटील, माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका जयश्रीताई पाटील, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, शिक्षक बंधू-भगिनी आणि विविध स्तरातील मान्यवरांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
यावेळी प्रा. मंदाकिनी भामरे यांनी भावना व्यक्त करतांना सांगितले की, “राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवून माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अशोकजी पवार सर आणि प्रफुल दादा पाटील यांची आभारी आहे. या विश्वासाला पात्र ठरत मी पूर्ण जबाबदारीने कार्य करणार आहे.”

त्यांच्या या निवडीमुळे मानवाधिकार क्षेत्रात अधिक प्रभावी काम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, अमळनेरच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आणखी नवे आदर्श निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *