४८ तासांचा अल्टिमेटम: अंमळनेरमध्ये पाण्यासाठी संताप उसळला; नगरपरिषदेला कायदेशीर निवेदन.!”*,   *७–८ दिवसांनी पाणी, तरीही पाणीपट्टी वसुली सुरूचं ; नागरिकांचा इशारा – “पाणी द्या, अन्यथा आंदोलन!”*
1 min read

४८ तासांचा अल्टिमेटम: अंमळनेरमध्ये पाण्यासाठी संताप उसळला; नगरपरिषदेला कायदेशीर निवेदन.!”*, *७–८ दिवसांनी पाणी, तरीही पाणीपट्टी वसुली सुरूचं ; नागरिकांचा इशारा – “पाणी द्या, अन्यथा आंदोलन!”*

Loading

*“४८ तासांचा अल्टिमेटम: अंमळनेरमध्ये पाण्यासाठी संताप उसळला; नगरपरिषदेला कायदेशीर निवेदन.!”*

*७–८ दिवसांनी पाणी, तरीही पाणीपट्टी वसुली सुरूचं ; नागरिकांचा इशारा – “पाणी द्या, अन्यथा आंदोलन!”*

अमळनेर (प्रतिनिधी ): शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईमुळे नागरिकांचा संताप आता उफाळून आला असून अंमळनेर नगरपरिषद प्रशासनाला ४८ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. “२ दिवसाआड पाणीपुरवठा” करण्याचा दावा प्रत्यक्षात पूर्णपणे कोलमडला असून अनेक भागांत नागरिकांना ७ ते ८ दिवसांपर्यंत पाणी मिळत नसल्याची गंभीर परिस्थिती आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना कायदेशीर निवेदन देण्यात आली असून, पाणीपुरवठ्याच्या गंभीर अनियमिततेवर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि दैनंदिन गरजांसाठी नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, पाणी हा जीवनावश्यक घटक असून त्याचा नियमित पुरवठा करणे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची कायदेशीर जबाबदारी आहे. तरीही नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा न होता देखील नागरिकांकडून पाणीपट्टीची सक्तीने वसुली केली जात आहे. एवढेच नव्हे, तर थकबाकीच्या कारणावरून नळ कनेक्शन तोडण्याच्या कारवाया केल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान, आगामी संत सखाराम महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात हजारो भाविक येणार असताना ही परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. पाणीपुरवठा सुरळीत न ठेवल्यास सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
नागरिकांनी प्रशासनासमोर ४८ तासांत नियमित पाणीपुरवठा सुरू करणे, अधिकृत वेळापत्रक जाहीर करणे, टँकरद्वारे पर्यायी व्यवस्था करणे, पाणीपट्टी वसुली थांबवणे आणि नळ कनेक्शन तोडण्याच्या कारवाया स्थगित करणे अशा मागण्या ठेवल्या आहेत.
जर या मागण्या निर्धारित वेळेत पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
शेवटी नागरिकांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली “पाणी हा आमचा हक्क आहे, भीक नाही! सेवा द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जा!”
यावेळी निवेदन देतांना अमळनेर शहर नागरिकांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष भूषण भदाणे, सनी गायकवाड, मनिष देसले, चेतन पाटील हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *