व्हॉट्सअ‍ॅप डीपीपासून सुंदर स्केचपर्यंत; विद्यार्थिनीच्या कलेने शिक्षकांना दिला भावनिक सन्मान!
1 min read

व्हॉट्सअ‍ॅप डीपीपासून सुंदर स्केचपर्यंत; विद्यार्थिनीच्या कलेने शिक्षकांना दिला भावनिक सन्मान!

Loading

व्हॉट्सअ‍ॅप डीपीपासून सुंदर स्केचपर्यंत; विद्यार्थिनीच्या कलेने शिक्षकांना दिला भावनिक सन्मान!

अमळनेर प्रतिनिधी
शिक्षक-विद्यार्थी नात्यातील आत्मीयता आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम आर्मी हायस्कूलमध्ये पाहायला मिळाला. शाळेचे उपक्रमशील शिक्षक शरद पाटील सर यांना त्यांच्या विद्यार्थ्याच्या बहिणीने एक अनोखे आणि हृदयस्पर्शी गिफ्ट देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
विद्यार्थी सुशांत मोरे याची बहीण दीक्षा मोरे (इयत्ता दहावी) हिने शरद पाटील सर यांचा व्हॉट्सअ‍ॅप डीपी पाहून त्यावर आधारित एक आकर्षक आणि जिवंत भासणारे स्केच तयार केले. तिच्या कलेतील बारकावे, अचूकता आणि भावनिक अभिव्यक्ती पाहून उपस्थित सर्वजण भारावून गेले.
दीक्षा मोरे हिने स्वतः शाळेत येऊन मोरे कुटुंबासह हे सुंदर स्केच फ्रेम करून शरद पाटील सरांना भेट दिले. हा क्षण अत्यंत भावनिक ठरला असून, शिक्षकांप्रती असलेल्या आदराची ही एक वेगळीच अभिव्यक्ती होती.
या अनोख्या भेटीबद्दल शरद पाटील सरांनी मोरे कुटुंबाचे मनापासून आभार मानले. तसेच, दीक्षा हिच्या कलागुणांचे कौतुक करत तिचे अभिनंदन केले आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारचे स्नेहपूर्ण आणि प्रेरणादायी संबंध निर्माण होत असतील, तर शिक्षणाला एक वेगळीच उंची प्राप्त होते, हे या प्रसंगातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *