राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे
1 min read

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

Loading

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

अमळनेर  प्रतिनिधी:-येथील जी.एस.हायस्कूल चे उपशिक्षक उमाकांत अशोकराव हिरे यांची अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिक्षक सेलच्या शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत यांनी सदरची नियुक्ती केली आहे.आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी शहराध्यक्ष चेतन राजपूत,निलेश महाजन,प्रकाश जैन,आर.जे.पाटील,शिक्षक भारती संघटनेचे तालुकाध्यक्ष विशाल वाघ, साने गुरुजी पतपेढीचे संचालक रोहित तेले, राहुल पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उमाकांत हिरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *