पत्रकार संजय देशमुख यांचा राज्यातील २० जणांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश
1 min read

पत्रकार संजय देशमुख यांचा राज्यातील २० जणांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश

Loading

पत्रकार संजय देशमुख यांचा राज्यातील २० जणांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश

पुष्पराज गावंडे,अरविंद देशमुख,वाजीदखॉ पठाण,पंजाबराव देशमुख,विनोद चाळके,संजय सोळंके,सुषमा ढोले,मनोहर मोहोड, दिलीप नवले यांचेसह अनेकजण उत्स्फूर्त जल्लोषात शिवसेनेत सामिल

प्रवेशप्रसंगी निवृत्त पोलिस उपायुक्त संजय धुमाळ,गिरधारीलाल सारडा,प्रा.प्रकाश डवले यांचेसह अनेक मान्यवरांची उपस्थिती.

अकोला- अकोला येथील ज्येष्ठ पत्रकार,माजी राज्यपाल शिक्षणमहर्षी डॉ.डी.वाय पाटील यांचे माजी स्विय सचिव व लोकस्वातंत्र्य या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख (निंबेकर) यांनी राज्यातील विविध ठीकाणच्या अग्रेसर २० कार्यकर्त्यांसह एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मुंबई येथे शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश केला आहे. याप्रसंगी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक,अकोला लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख,आमदार राजन साळवी,पांडूरंग पाटील व संजय कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिवसेना पक्षप्रवेशामध्ये कादंबरीकार पुष्पराज गावंडे,(अकोला)अरविंदराव देशमुख (नागपूर) पंजाबराव देशमुख (खामगांव) वाजीदखॉ पठाण,गणेश मोरे (परभणी) संजय सोळंके,उमेश चौधरी,अल्केश देशमुख,आदित्य सोळंके (ठाणे) सौ.सुषमा ढोले (डोंबिवली) मनोहर मोहोड, दिलीप नवले (अकोला) विनोद चाळके,कमलेश कुबल,(मुंबई) सि.ए.तुषार तल्हार,प्रशांत करोतिया (बोईसर) आणि अनेकांच्या गळ्यात मा.एकनाथराव शिंदे यांनी दुपट्टे टाकून सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.

या प्रवेशाच्या शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी ठाण्याचे सेवानिवृत्त पोलिस उपअधिक्षक संजय धुमाळ,प्रा.प्रकाश डवले,गजानन कृषी बाजारचे गिरधारीलाल सारडा (वाशिम) शाखाप्रमुख स्मिता साळवी,
यांचेसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

मलबार हिलमध्ये एकनाथराव शिंदे यांच्या नंदनवन बंगल्याच्या प्रांगणात प्रचंड घोषणांच्या निनादात हा पक्षप्रवेश पार पडला.ही राजकीय क्षेत्रातील महत्वपूर्ण घडामोडी मानली जात आहे.संजय देशमुख हे लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या व लोकस्वातंत्र्य सामाजिक सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाढलेला प्रचंड,समानतेच्या भावनांची सर्वसमावेशकता, आणि प्रेमाच्या शक्तीने माणसं जोडण्याचे कौशल्य हे शिवसेनेच्या गगणभरारीसाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जाते. त्यांचे पत्रकारिता सामाजिक आणि सहकार क्षेत्रात ३५ वर्षाचे योगदान असून,ते मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष,स्त्री राखीव महिला जागेमुळे ते पाच वर्ष बाळापूर तालूक्यातील निंबा येथील उपसरपंच होते. त्यांच्यासोबत संजय धुमाळ आणि मंत्रालयीन अव्वर सचिव गजानन देशमुख सुध्दा प्रवेश घेणार असून अनेक सामाजिक नेत्यांनी आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी जवळच आलेल्या सेवानिवृत्तीनंतर एकनाथराव शिंदे यांच्या कर्तृत्व आणि नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत त्यांच्यासोबत प्रवेश घेण्याचे अभिवचन‌ संजय देशमुख यांना दिले आहे. संजय देशमुख यांचे राज्यभरातील अग्रेसर उपक्रम, जनसंपर्क आणि परिचयाने शिवसेना पक्ष मजबूत संघटनाचे शिखर काबिज करेल अशा प्रतिक्रिया राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.संजय देशमुख यांतून सर्वांच्या या पक्षप्रवेशाच्या नव्या भुमिकेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *