सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियान परीक्षा 25 एप्रिल रोजी पन्नासहून अधिक गरजू होतकरू विद्यार्थ्यांना निवास, भोजन ,स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण मिळणार मोफत
1 min read

सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियान परीक्षा 25 एप्रिल रोजी पन्नासहून अधिक गरजू होतकरू विद्यार्थ्यांना निवास, भोजन ,स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण मिळणार मोफत

Loading

सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियान परीक्षा 25 एप्रिल रोजी
पन्नासहून अधिक गरजू होतकरू विद्यार्थ्यांना निवास, भोजन ,स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण मिळणार मोफत

जळगाव प्रतिनिधी – जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील गरीब आणि गरजू होतकरू विद्यार्थ्यांसाठी सतपंथ चारिटेबल ट्रस्ट फैजपूर आणि नोबेल फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियान प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.यासाठी इयत्ता दहावी नंतर ज्या विद्यार्थ्यांना आयआयटी प्रवेश परीक्षा जेईई तसेच वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट ची तयारी करायची असेल मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असेल अशा विद्यार्थ्यांना या अंतर्गत विनामूल्य निवास, भोजन आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे.
तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये क्षमता असतात परंतु या विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ तसेच योग्य मार्गदर्शन नसते म्हणून पदवीला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षांच्या तयारीसाठी विनामूल्य निवास, भोजन व प्रशिक्षण दिले जाणार आहे.यासाठी सतपंथ शिष्यवृत्ती महाभियान प्रवेश परीक्षा 25 एप्रिल शनिवार रोजी तीनही जिल्हा केंद्रावर सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे. जळगाव केंद्रासाठी रोजलँड इंग्लिश मीडियम स्कूल डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ गणेश कॉलनी तर धुळे येथे द युनिक अकॅडमी वाडी भोकर रोड आणि नंदुरबार येथे समुत्कर्ष क्लासेस गिरीविहार गेट येथे परीक्षा सकाळी दहा ते एक या वेळात संपन्न होणार आहे.
याप्रसंगी उद्घाटक म्हणून परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन महाराज,आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे,उपमहापौर मनोज चौधरी,नगरसेवक नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा लाभ घ्यावा असे आवाहन नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी 9922004193 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *