७८ देशांत विस्तार, लाखो पत्रकारांचा विश्वास; पत्रकारांच्या हक्कांसाठी उभा राहिलेला जागतिक आवाज
1 min read

७८ देशांत विस्तार, लाखो पत्रकारांचा विश्वास; पत्रकारांच्या हक्कांसाठी उभा राहिलेला जागतिक आवाज

Loading

व्हॉईस ऑफ मीडिया’ ते ‘व्हॉईस ऑफ ग्लोबल’…!

७८ देश, ४ लाख ७० हजार पत्रकार आणि साडेचार हजार पूर्ण वेळ पत्रकार पदाधिकारी असणारी पत्रकार संघटना ही ओळख आहे अवघ्या चार वर्षांत जगात नंबर वन ठरलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या संघटनेची, संस्थेची. ८०० कोटी लोकसंख्या असलेल्या जगात साडेचार लाख पत्रकार आहेत. त्याच पत्रकारांच्या सोळाशे संघटना आहेत. यातील अनेक संघटनेचा इतिहास चाळीस वर्षांपूर्वीचा आहे. त्या संघटनेचा पुढचा इतिहास करत अवघ्या चार वर्षांत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व्हाया इंडिया ‘व्हॉईस ऑफ ग्लोबल’ ही ओळख कशी बनली हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

एक संपादक निघाला होता, चांगुलपणाचे गुणगाण आपल्या लेखनीतून मांडण्यासाठी. तेव्हा त्या प्रवासात त्यांनी पाहिले आपलेच पत्रकार बांधव, त्याचा परिवार मोठ्या अडचणीत आहे. अनेक पत्रकार उपाशीपोटी तत्त्व-मूल्यांच्या लढाईसाठी झगडतोय. त्याची किंमत त्यांच्या कुटुंबाला मोजावी लागते. तेव्हाच त्या संपादकाने ठरवले आता आपण अवघे आयुष्य या पत्रकार बांधव, लोकशाही टिकवणाऱ्या पत्रकारितेला द्यायचे. एका ध्येयवेड्या संपादकाने पत्रकार जगला पाहिजे, पत्रकारिता वाचली पाहिजे, सकारात्मक पत्रकारिता रुजली पाहिजे, हे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यासाठी त्याने अहोरात्र मेहनत घेतली. अवघे जग पायाखाली घातले. जगातील पत्रकारितेचा अभ्यास केला. पत्रकारांसाठी मोठे संशोधन केले. त्या ध्येयवेड्या संपादकाने त्याच्यासोबत अनेक ध्येयवेडे संपादक, पत्रकार घेतले आणि मागच्या चार वर्षांत या देशात जे काम उभे राहिले त्याचा इतिहास झालाय.

त्या ध्येयवेड्या संपादकांचे नाव आहे संदीप काळे! होय, संदीप काळे. संदीप काळे यांनी त्यांच्यासोबत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ला एका उंचीवर नेण्यासाठी चंद्रमोहन पुप्पाला, मंदार फणसे, संजय आवटे, धर्मेंद्र जोरे, राहुल पांडे, शंतनू डोईफोडे, अनिल म्हस्के, अश्विनी सातव-डोके, योगेंद्र बोरकर, अजितदादा कुंकूलोळ, मंगेश खाटीक, विजय चोरडिया, दिगंबर महाले, चेतन कात्रे, अरुण ठोंबरे, अमर चौंदे, दिव्या भोसले, विजय बाविस्कर, रमेश कुलकर्णी, भिमेश मुतुला, मुफ्ती मोहम्मद हारून नदवी अशी अनेक मंडळी सोबत घेतली आणि आपला मजल दरमजलचा प्रवास आखला.
पत्रकारांसाठी पत्रकारांचे घर, आरोग्य, मुलांचे शिक्षण, नवीन तंत्रज्ञान शिकणे, निवृत्तीनंतरचे प्रश्न सोडवणे या पाच विषयांवर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने काम सुरू केले. पत्रकारितेसाठी सकारात्मक पत्रकारिता,पत्रकारितेमधील नावीन्यता,
शांततेसाठीचे वार्तांकन किंवा सामाजिक सलोख्याची पत्रकारिता, पत्रकारितेमधील संशोधन आणि साधने, पत्रकारितेमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही पंचसूत्री घेऊन काम सुरू केले. प्रत्येक राज्यात या कामाने गती घेतली. आरोग्य, शिक्षण सेल सर्व राज्यांत सुरू केले. मागच्या दोन वर्षांत ४८ हजार पत्रकारांचा विमा काढला. ६५ हजार पत्रकारांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत केली. शासनाच्या मदतीपासून वंचित असणाऱ्या ८ हजार पत्रकारांना मदत मिळवून दिली. १३ हजार पत्रकारांना गंभीर आजारासाठी मदत केली. मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांत सरकारला धारेवर धरत पत्रकारांसाठी ऐतिहासिक निर्णय पदरात पाडून घेतले. प्रत्येक राज्यात ३४० पेक्षा अधिक उपक्रम पत्रकारांसाठी घेतले. अनेक देशांत पत्रकार आणि पत्रकारितेसाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले.
प्रत्येक राज्यात पत्रकारांना उद्योगासाठी दर वर्षी दोनशे कोटी रुपयांचा निधी देत पत्रकार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. या महामंडळाच्या माध्यमातून पत्रकारांना व्यवसायासाठी प्रोत्साहित करावे. जे पत्रकार अर्धवेळ आहेत, ज्या पत्रकारांना ४० हजार रुपयांच्या आतमध्ये पगार आहे, असे पत्रकार यासाठी पात्र असतील, अशी मागणी शासन दरबारी लावून धरली. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पत्रकारांसाठी नाममात्र दरात शंभर घरे बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नव्या तंत्रज्ञानासाठी कौशल्य विद्यापीठ, हे तीन विषय आम्ही लवकरच मार्गी लावणार आहोत. सेवानिवृत्तीनंतर पत्रकारांचे मानधन ११ हजारावरून २० हजार, टीव्ही रेडीओ आणि डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना श्रमिक पत्रकार म्हणून मान्यता, असे अनेक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या रेट्यामुळे शासनाला घ्यावे लागले.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही माझी संघटना आहे, या भावनेतून जगभरातून कित्येक पत्रकार ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ मध्ये सहभागी होऊ लागले आहेत. ‘इंडिया बुक ऑफ रेकार्ड’ने ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ला देशातील सर्वात मोठी सदस्य संख्या असलेली पत्रकारांची संघटना, संस्था आहे, असे नामांकन दिले आहे, तर ‘गिनीज बुक ऑफ रेकार्ड’ने पत्रकारांसाठी काम करणारी देशातील सर्वात आघाडीची संस्था म्हणून गौरव केला आहे. ना मिरवायचे, ना कुण्या पक्षाला पाठिंबा द्यायचा, ना कुण्या जातीचा झेंडा घेऊन मिरवायचे, असे आम्ही सर्वांनी मिळून ठरवले. जीवात जीव आहे तोपर्यंत पत्रकार आणि पत्रकारांसाठी काम करायचे. आज ‘व्हॉईस ऑफ मीडिया’त काम करणाऱ्या पत्रकार सदस्यांची संख्या १ लाख ७० हजार आहे. येत्या तीन वर्षांत ती ३ लाखांपेक्षा जास्त असेल, असे ध्येय आम्ही उराशी बाळगले आहे. आज आम्ही भारत देश जिंकून आंतरराष्ट्रीय दिशेने वाटचाल करतोय. येत्या दोन वर्षांत आम्हाला जगातल्या प्रत्येक देशात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चा झेंडा लावायचा आहे. चला तर…. पत्रकार मित्रांनो, या तत्वमूल्यांच्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ नावाच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पत्रकारांच्या चळवळीत येण्यासाठी आम्ही आपल्याला आवाहन करीत आहोत. आता सर्व पत्रकारांचा एकच नारा ठेवू ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा.
मी सहभागी झालो, तुम्ही पण सहभागी व्हा..!

……………………

पत्रकारांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने आखलेली पंचसूत्री.
पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य, पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण, पत्रकारांचे घर, पत्रकारांसाठी स्कीलिंग, पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर काय? या विषयांवर काम सुरू केले आहे.

पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबांचे आरोग्य

व्हॉईस ऑफ मीडियाच्या पंचसूत्रीमध्ये पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य हा पहिला विषय आहे. यामध्ये पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे संपूर्ण आरोग्य, त्या पत्रकारांच्या कुटुंबीयांची पॉलिसी काढण्यासंदर्भामध्ये व्हॉईस ऑफ मीडियाने पुढाकार घेतलाय. प्रत्येक जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी दर सहा महिन्याला व्हॉईस ऑफ मीडिया पुढाकार घेऊन सर्व पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाची सर्व प्रकारची तपासणी करते. त्या तपासणीप्रमाणे लागणारी औषधे, त्यांची नेहमीची तपासणीची जबाबदारी व्हॉईस ऑफ मीडियाची असेल. औषध आणि तपासणी मोफतपणे मिळवून देण्यासंदर्भातली भूमिका व्हॉईस ऑफ मीडियाची असेल. सदस्य पदाधिकाऱ्यांसाठी विमा काढण्यासंदर्भातली भूमिका जबाबदारी व्हॉईस ऑफ मीडियाची आहे. दरवर्षी व्हॉईस ऑफ मीडिया हा विमा काढेल. त्या विम्याच्या माध्यमातून अपघात आणि पत्रकारांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयाला मोठा आधार मिळावा ही भूमिका व्हॉईस ऑफ मीडियाची आहे.

 

मागच्या चार वर्षांमध्ये ७० हजार पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाची तपासणी व्हॉईस ऑफ मीडियाने केली. त्यांना लागणारी औषधे, साधन सामग्री यांचा पुरवठाही ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने केला. जिल्हा, तालुका, शहर या ठिकाणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे विभिन्न कॅम्पस आयोजित केले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

गेल्या चार वर्षांत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने 48 हजार पत्रकारांच्या पॉलिसी काढल्या. दरवर्षीही पॉलिसी रिन्यू करण्यासंदर्भात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने पुढाकार घेतला. अनेक पत्रकारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना या पॉलिसीचा मोठा फायदा झाला.

पत्रकारांच्या मुलांना शैक्षणिक मदत

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पंचसूत्रेमधील दुसरा महत्त्वाचा विषय पत्रकारांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत आहे.

पत्रकारांच्या मुलांचा शाळा, कॉलेजमध्ये कमी खर्चात प्रवेश व्हावा पत्रकारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य मिळावे. पत्रकारांच्या मुलांसाठी उच्च शिक्षणाचे दरवाजे कमी खर्चात खुले व्हावेत. पत्रकारांच्या मुलांनी प्रोफेशनल शिक्षण शिकावे. पत्रकारांच्या मुलांनी शिक्षणासाठी परदेशात जावे, ही भूमिका घेऊन ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने पत्रकारांच्या मुलांच्या शिक्षणाचा अजेंडा विकसित केला.

शिक्षण समितीच्या माध्यमातून पत्रकारांच्या मुलांचे असलेले प्रश्न पहिल्यांदा समजून घ्यायचे आणि नेमकी गरज काय आहे या संदर्भातली माहिती मागवायची. फॉर्म भरून घ्यायचे आणि त्या माहितीप्रमाणे गरजू असणाऱ्या पत्रकारांच्या मुलांना मदत करायची. वयानुसार पत्रकारांच्या वेगवेगळ्या मुलांचे असणारे प्रश्न, त्यांना लागणारी साधन-सामग्री यासाठी आम्ही विविध कक्ष स्थापन केलेले आहेत.

यामध्ये शालेय शैक्षणिक समिती, उच्च शिक्षण शैक्षणिक समिती, आरोग्य शैक्षणिक समिती इंजिनिअरिंग शैक्षणिक समिती, वसतिगृह समिती यांचा समावेश आहे.

 

शैक्षणिक समितीच्या माध्यमातून चेतन कात्रे, डॉ. प्रमोद दस्तुरकर, गजानन मोरे यांसारखे अनेक जण या समित्यांमध्ये काम करतात. त्यांनी केलेल्या कामाला प्रचंड प्रतिसाद ही मिळतोय.

गेल्या चार वर्षांत शैक्षणिक समितीच्या माध्यमातून, खूप मोठे काम उभे राहिले आहे. या सगळ्या कामांसाठी महाराष्ट्र राज्य ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने एक केस स्टडी बनवला. या माध्यमातून अनेक उपक्रम राबवून अगोदर महाराष्ट्र, मग देश आणि मग जगातले व्हॉईस ऑफ मीडियाशी संबंधित असणारे सर्व देशांमध्ये हे उपक्रम राबवले जात आहेत.

 

गेल्या चार वर्षांमध्ये सोळा हजार पत्रकारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. दीड हजार शालेय मुलांच्या प्रवेशा संदर्भामध्ये आणि पुढाकार घेतला. उच्च शिक्षणासाठी अडीच हजार मुलांना मदत करण्यात आली. 48 हजार मुले परदेशामध्ये शिक्षणासाठी पाठवण्यात आली. चौदाशेहून अधिक मुलांचा वेगवेगळ्या वसतिगृहामध्ये प्रवेश करण्यात आला.

 

पत्रकारांचे घर

 

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पंचसूत्री मधला तिसरा महत्त्वपूर्ण मुद्दा पत्रकारांच्या घराबद्दलचा आहे. पत्रकारांचे घर असावे आणि ते कमीत कमी किमतीमध्ये मिळावे, हे ध्येय मनामध्ये घेऊन पत्रकारांच्या घरासंदर्भातले अनेक प्रोजेक्ट ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने हाती घेतले. त्या त्या ठिकाणी स्थानिक पातळीवरील प्रशासन, राजकीय मंडळी, केंद्र सरकार, राज्य सरकार या सर्वांची मदत घेऊन पत्रकारांना घर देण्यासंदर्भातली भूमिका ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची आहे. पत्रकारितेमध्ये अख्खी हयात गेली, पण छोटसे घरही नाही, अशा पत्रकारांची संख्या शेकड्याने आहे. या पत्रकारांना आणि त्याच्या कुटुंबीयांना एक मायेचा आधार मिळावा आणि आयुष्यभर येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा डोक्यावर छत असावे, ही भावना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची होती.

पत्रकारांच्या घरांसाठी महाराष्ट्र हे यासाठी एक मॉडेल आहे. महाराष्ट्रामध्ये हिंगोली, परभणी, संभाजीनगर, धाराशिव, चंद्रपूर, या जिल्ह्यांमध्ये घरांचा प्रोजेक्ट सुरू करण्यासंदर्भातल्या हालचालींना वेग आला आहे. एका ठिकाणी पन्नास ते शंभर घरे बनवावेत हा उद्देश ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा आहे.

या संदर्भात स्थानिक पातळीवर एक कमिटी, सोसायटी स्थापन करून त्या कमिटी आणि सोसायटीच्या माध्यमातून कामाला गती मिळवावी यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने पुढाकार घेतला आहे. व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रमुख पदाधिकारी सदस्य आणि स्थानिक पातळीवर असणारे गरजवंत पत्रकार या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

 

पत्रकारांचे स्किलिंग

काळाप्रमाणे आपली पावले बदलली पाहिजे. काळाप्रमाणे पत्रकारांनी स्वतःमध्ये सगळे बदल केले पाहिजे. या भूमिकेतून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने पुढाकार घेतला. अनेक पत्रकार काळ किती बदलला तरी आपल्या जुन्या पद्धतीने पत्रकारिता करतात. पत्रकारिता, पत्रकारितेचे सादरीकरण करतात. त्यामुळे काळानुरूप त्यांच्या कार्याला आणि उन्नतीला गती मिळत नाही. हाच विषय घेऊन पंचसूत्रीमध्ये स्किलिंग हा विषय घेतला.

अनेक ठिकाणी सातत्याने होणारे केडर कॅम्प, नियमित पत्रकारिता या संदर्भातले कोर्सेस, अद्ययावत तंत्रज्ञान शिकण्यासंदर्भातला पुढाकार व्हॉईस ऑफ मीडियाने घेतला.

 

मागच्या दोन वर्षांत व्हॉईस ऑफ मीडियाने साडेसहा हजार पत्रकारांना प्रशिक्षित करण्यासंदर्भात पुढाकार घेतला, मग त्यामध्ये पत्रकारितेचे शिक्षण असो की संगणक शिक्षण असो, यामध्ये अनेकांनी आपला सहभाग नोंदवला.

जगामध्ये जेवढे पत्रकार आहेत त्यांना काळाप्रमाणे प्रशिक्षण देण्यासंदर्भात व्हॉईस ऑफ मीडिया पुढाकार घेत आहे. अगोदर गाव पातळीवरील पत्रकार, मग तालुका, मग जिल्हा, मग राज्य, मग जग अशा जगातल्या सगळ्या देशांमध्ये व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकारांसाठी प्रशिक्षण घेणार आहे.

पत्रकारांसाठी ऑनलाईन स्वतंत्र युनिव्हर्सिटी असावी आणि ती स्किलिंग बेस असावी, ही भूमिका घेत व्हॉईस ऑफ मीडियाने राज्य आणि केंद्र शासनाकडे यासंदर्भात मागणी केली आहे. त्या मागणीचा सकारात्मक विचारही होऊ लागलेला आहे. येत्या दोन वर्षांत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची स्किलिंग संदर्भातली स्वतंत्र युनिव्हर्सिटी येणार आहे. ज्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून जगातल्या सगळ्या पत्रकारांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

चिरंतर आणि निरंतर चालणारी प्रक्रिया या प्रक्रियेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयाला समृद्ध करण्यासंदर्भात व्हॉईस ऑफ मीडिया आग्रही आहे. कम्युनिटी रेडीओच्या माध्यमातून प्रशिक्षित करण्यासंदर्भातली भूमिका मीडियाने घेतलेली आहे.

येत्या पाच वर्षांत व्हॉईस ऑफ मीडिया पाच कम्युनिटी रेडीओची सुरुवात करणार आहे. त्यातला पहिला कम्युनिटी रेडिओ बार्शी जिल्हा सोलापूर येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या ग्रामीण मुख्य कार्यालयामध्ये या वर्षभरामध्ये सुरू होत आहे.

पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर काय?

 

व्हॉईस ऑफ मीडियाच्या पंचसूत्रीमधील सर्वात शेवटचा विषय पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या असणाऱ्या अडचणी आणि त्या संदर्भात करण्यात येणाऱ्या तजवीज संदर्भामध्ये भूमिका आहे. काम करणारा माणूस कधी तरी सेवानिवृत्त होतो आणि तो सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याचे प्रश्न अधिक गांभीर्याचे असतात. त्या वयामध्ये आधार देणारा कोणीतरी भक्कम पाठीराखा सोबत असावा असं प्रत्येकाला वाटत असते. हाच विषय पुढे घेत व्हॉईस ऑफ मीडियाने सेवानिवृत्त होणाऱ्या पत्रकारांसाठी खंबीरपणे पाठीराखा म्हणून भूमिका बजावण्यासंदर्भात पुढाकार घेतला आहे. पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर येणाऱ्या अडचणी, सेवानिवृत्ती मानधन, सेवानिवृत्तीनंतर सुरू करण्यासंदर्भातले उद्योग, व्यवसाय छोटे छोटे उपक्रम यासाठी मीडियाने पुढाकार घेतला आहे.

 

महाराष्ट्रामध्ये सेवांनिवृत्त झालेल्या पत्रकारांना अकरा हजार रुपये एवढे मानधन दिले जायचे. हे मानधन अत्यंत तुटपुंजे आहे. त्या मानधनात किमान दुप्पट वाढ करावी, अशी मागणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने केली होती. त्या संदर्भामध्ये अनेक वेळा धरणे आंदोलन, उपोषण करण्यात आले. शेवटी सरकारने व्हॉईस ऑफ मीडियाच्या भूमिकेला पाठिंबा देत त्या पत्रकारांचे मानधन वीस हजार रुपये केले.

अनेक पत्रकारांना त्यांच्या मुलांनी सांभाळण्यासाठी नकार दिला होता. त्यांना सांभाळण्याची भूमिका व्हॉईस मीडियाने घेतली, अनेक ठिकाणी त्या न सांभाळणाऱ्या मुलांची समजूत काढण्यासाठी पुढाकार घेतला.

या संदर्भात मीडियाची स्वतंत्र टीम आणि समिती काम करत आहे.

…………

 

 

 

 

उद्देश

पत्रकार आणि पत्रकारांसाठी काम करण्याच्या उद्देशाने व्हॉईस ऑफ मीडियाचा जन्म झाला. समाजामध्ये पत्रकार हा सगळ्यात आघाडीचा आणि महत्त्वाचा घटक आहे. असे असताना हा घटक सर्वसमावेशक मधून दुर्लक्षच होऊ लागलेला आहे. या घटकाला लागणाऱ्या सर्वांगीण विषयाच्या अनुषंगाने असणाऱ्या बाबी उपलब्ध करून देण्यासाठी आणि पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे. पत्रकारिता, पत्रकार टिकला पाहिजे, पत्रकार आणि पत्रकारितेच्या मागे भक्कमपणे आधार म्हणून उभे राहण्याच्या उद्देशाने व्हॉईस ऑफ मीडियाची सुरुवात झाली.

 

ध्येय

जगातल्या शेवटच्या पत्रकारांपर्यंत जाऊन पोहोचणे. त्या पत्रकारांच्या मागे एक बॅकिंग सपोर्ट म्हणून उभे राहायचे. जगात असणारे सर्व पत्रकार व्हॉईस ऑफ मीडियाच्या झेंड्याखाली एकत्रित येतील. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने घेतलेली पत्रकार आणि पत्रकारितेसाठी पंचसूत्री आणि जगातल्या शेवटच्या पत्रकारांपर्यंत घेऊन जायची आहेत. पत्रकारिता सर्वंकष, उत्तमरीत्या केली गेली पाहिजे. पत्रकार समाधानाने आणि ध्येयाने प्रेरित होऊन लिहिता झाला पाहिजे, हे ध्येय व्हॉईस ऑफ मीडियाचे आहे.

व्हीजन

 

जगातल्या सर्व पत्रकारांनी पत्रकारितेची तत्त्व, मूल्य जपली जाऊन पत्रकारिता करता यावी. त्या पत्रकारांनी निडर होऊन सातत्याने लिहावे. तिथले प्रश्न मांडावेत, त्यांच्या सामाजिकरणामध्ये अर्थकारण सक्षमपणे व्हावे, त्यांचे सर्व प्रश्न सुटावेत, हे व्हॉईस ऑफ मीडियाचे व्हीजन आहे.

 

 

मिशन

 

जगातल्या सर्व पत्रकारांपर्यंत व्हॉईस ऑफ मीडियाला पोहोचवायचे आहे. त्या त्या भागातले, त्या त्या देशातले पत्रकार आणि पत्रकारितेचे प्रश्न समजून घेऊन जे जटिल प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत. तिथल्या चांगल्या सामाजिक जगण्यासाठी पत्रकारिता किती उपयोगाची आहे हे कार्य करायचे आहे.

जर्नी

 

चार वर्षांपूर्वी सुरू झालेली व्हॉईस ऑफ मीडिया आज जगातल्या 41 देशांपर्यंत पोहोचलेली आहे. पत्रकारांसाठी पत्रकारांचे घर, पत्रकारांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य, पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण, पत्रकारांची स्किलिंग, पत्रकारांच्या सेवानिवृत्तीचे प्रश्न हाताळणे, अशा पाच विषयांवर काम सुरू केले.

पत्रकारितेसाठी सकारात्मक पत्रकारिता

पत्रकारितेमधील नावीन्यता,
शांततेसाठीचे वार्तांकन किंवा सामाजिक सलोख्याची पत्रकारिता

पत्रकारितेमधील संशोधन आणि साधने

पत्रकारितेमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य

अशी पंचसूत्री हाती घेतली. आज एक लाख 70 हजार एवढा पत्रकारांचा जनसमुदाय व्हॉईस ऑफ मीडियाच्या पाठीमागे उभा आहे. येत्या दोन वर्षात 195 देशांत पोहोचून साडेतीन लाख पत्रकार व्हॉईस ऑफ मीडियाच्या झेंड्याखाली येणार आहेत.

 

हे का करतो आम्ही

 

जगातल्या शेवटच्या टोकावरचा प्रश्न सोडवण्यासाठी जर कोण पुढाकार घेत असेल तर तो आहे पत्रकार. आणि त्या पत्रकारांची पत्रकारिता आज धोक्यात आहे. आज काळ खूप बदलत आहे, अनेक देशांमध्ये हुकूमशा डोकावत आहेत. या सगळ्यांमध्ये पत्रकार आणि पत्रकारिता यांच्यावर प्रचंड संकट आलेले आहे. पत्रकार वाचला तर जग वाचेल, हे सत्य आज कोणी म्हणायला तयार नाही. व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आम्ही पुढाकार घेतलाय तो यासाठीच की, इथली पत्रकारिता आणि पत्रकार वाचावा. जगामध्ये सर्वत्र शांतता नांदावी. ही भूमिका व्हॉईस ऑफ मीडियाची आहे. आम्ही कुणाला पाठिंबा देत नाही. आम्ही कुण्या पक्षासाठी काम करत नाही. आम्हाला इतर कोणाला सोबत घेऊन काम करायचे नाही. आम्ही केवळ पत्रकार आणि पत्रकारितेसाठी काम करतो. त्यासाठी आम्ही व्हॉईस ऑफ मीडियाचा झेंडा खांद्यावर घेत मजल दरमजल प्रवास करतोय. हा प्रवास भारत देशांमधून सुरू होवून 41 देशांपर्यंत गेलाय पुढे 195 देशांपर्यंत जाऊन थांबणार आहे.

…………..

 

व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारितेसाठी खालील पाच पंचसुत्रीचा अवलंब आम्ही केला आहे.

 

सकारात्मक पत्रकारिता

पत्रकारितेमधील नाविन्यता

शांततेसाठीचे वार्तांकन किंवा सामाजिक सलोख्याची पत्रकारिता

पत्रकारितेमधील संशोधन आणि साधने

पत्रकारितेमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य

सकारात्मक पत्रकारिता

 

मुळात पत्रकारितेचा हेतू हा सर्वांगीण विकास आणि चांगुलपणाची पेरणी करणे हाच आहे. पण काळानुरूप पत्रकारितेचे स्वरूप बदलत गेले आणि पत्रकारितेकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू लागला. व्हॉईस ऑफ मीडियाने सकारात्मक पत्रकारितेची कास धरत ही पत्रकारिता अधिक विकसित झाली पाहिजे यासाठी पुढाकार घेतला पाहिजे चांगले समाजासमोर आणले गेलं पाहिजे, चलोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे, ही भूमिका घेत व्हॉईस ऑफ मीडिया काम करत आहे. समाजात असणारे अनेक महत्त्वपूर्ण घटक जे वंचित आहेत त्यांना न्याय देण्याची भूमिका पत्रकारितेच्या माध्यमातून व्हावी आणि त्यासाठी काम करायला अधिक वाव मिळावा यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला.

सकारात्मक पत्रकारिता गतीने झाली पाहिजे. यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाने पुरस्कार आयोजित केले होते. त्यामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये पुरस्कार देण्यात आले. पहिल्या सकारात्मक पत्रकारिता पुरस्कारासाठी तेहतीस जणांचे अर्ज आले होते. त्यातून सात लोकांना पुरस्कार देण्यात आले. पत्रकारितेसाठी काम करणारा आणि पत्रकारांसाठी काम करणारे वेगळा घटक आपल्या परिसरामध्ये आहेत. या घटकाचा, त्या माणसाने केलेल्या कामाचा सन्मान झाला पाहिजे, या उद्देशाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुरू केला. ज्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या माध्यमातून राज्यात काम करणाऱ्या खूप मोठ्या व्यक्तीचा सन्मान करता आला. आम्ही या उपक्रमात सरकारला सोबत घेतले. ज्या माध्यमातून सरकारपर्यंत या काम करणाऱ्या चांगल्या लोकांचा अजेंडा पोहोचल्या जाणार होता.

 

पत्रकारितेमधील नावीन्यता

नव्याने शोध घेणे आणि त्या नव्याने घेतलेल्या शोधाची सगळ्यांना माहिती देणे, हा पत्रकारितेचा मुख्य पिंड आहे. सातत्याने नवीन काहीतरी असावे आणि त्या माध्यमातून सामाजिकतेचा स्वार्थ साधावा हे पत्रकारितेचे कवचकुंडल आहे. त्यामुळे नावीन्यपूर्ण पत्रकारिता असली पाहिजे आणि त्या पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक हित जोपासले गेले पाहिजे, हा उद्देश घेऊन व्हॉईस ऑफ मीडियाच्या पत्रकारितेच्या पत्रकारितेसाठी आखणी करण्यात आलेल्या पंचसूत्रीमध्ये पत्रकारितेतील नावीन्यपूर्ण महत्त्व देण्यात आलेले आहे.

पत्रकारितेची परिभाषा बदलली पाहिजे, नव्याने अनेक विकसित झालेल्या गोष्टी शिकल्या पाहिजे, यासाठी पत्रकारितेच्या साधनांमध्ये सुद्धा नावीन्यता असणे गरजेचे आहे. नावीन्यतेचा शोध घेत व्हॉईस ऑफ मीडिया सातत्याने नवीन उपक्रम याची आखणी करत असते. माध्यमांच्या सर्व परिभाषांसाठी व्हॉईस ऑफ मीडियाने शोधलेली कल्पक कृती उपयोगाची ठरणार आहे. त्यासाठी आम्ही व्हॉईस ऑफ मीडिया सेंटरची सुरुवात करत आहोत.

 

शांततेसाठीचे वार्तांकन किंवा सामाजिक सलोख्याची पत्रकारिता

 

पत्रकारांना नेहमी सामाजिक सलोख्याचा विचार करावा लागतो. दंगल झाली, दोन गटात भांडण झाले, देशा देशांमध्ये तणाव वाढले, जातीजातीमध्ये तणाव वाढले. अशावेळी करण्यात येणारे वार्तांकन हे सौम्य आणि दोन मनांना एकत्रित करण्याचं असलं पाहिजे. ही भूमिका घेऊन सातत्याने पत्रकारिता होते. जशी तेढ निर्माण झाल्यावर पत्रकारिता करण्यासाठी सगळेजण आग्रही असतात. तशी भूमिका रोजच्या पत्रकारितेमध्ये घेतली जावी असा आग्रह व्हॉईस ऑफ मीडियाचा आहे. त्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया पुढाकार घेत आहे. शिक्षण, प्रशिक्षण, फेलोशिप, ट्रेनिंग, पुरस्कार या सर्व विषयांच्या माध्यमातून व्हॉईस ऑफ मीडिया या विषयाला बांधील असणार आहे.

 

पत्रकारितेमधील संशोधन आणि साधने

 

संशोधन झाल्याशिवाय कुठलाही विषय तडीस नेला जाऊ शकत नाही. त्यासाठी संशोधन खूप महत्त्वाचे असते. संशोधनाच्या माध्यमातून आलेली आकडेवारी उदाहरणे, माहिती, प्रश्नावली, नियमावली या सर्वांच्या माध्यमातून अनेक उत्तर सहजपणे सापडतात. पत्रकारितेमध्ये आणि पत्रकारांसाठी सातत्याने संशोधन करणे, अनेकांचे झालेले संशोधन सर्वांसमोर आणणे आणि त्या संशोधनाच्या माध्यमातून अनेक गंभीर प्रश्नांची उकल करणे संशोधनाच्या माध्यमातून पत्रकार आणि पत्रकारितासाठी सातत्याने काम करणे यासाठी मीडियाचा पुढाकार असणार आहे. संशोधनासाठी लागणारी साधने विकसित झालेली, नवनवीन तंत्रज्ञान या सर्वांच्या माध्यमातून व्हॉईस ऑफ मीडियाच्या उभारणी संशोधन आणि साधने या दोन्ही विषयाला प्रचंड महत्त्व असणार आहे. यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे स्वतंत्र संशोधन सेंटर ही असणार आहे.

—–

पत्रकारितेमधले अभिव्यक्ती स्वातंत्र्य

 

पत्रकारितेमध्ये जोपर्यंत अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही तोपर्यंत पत्रकार सामाजिक प्रश्न मांडू शकत नाही. अलीकडे पत्रकारांवर येणारे दबाव, माध्यमांच्या मालकांचे असणारे लागेबांधे, यामुळे कित्येक वेळा पत्रकारांची बातमी लिहिताना दमछाक होते. अनेक देशांमध्ये हत्ये सारखे प्रकार पुढे आले आहेत. खोटे आरोप, गुन्हे दाखल करणे, पत्रकारांवर हल्ले करणे यांसारखे अनेक प्रसंग पुढे येऊ लागलेले आहे. व्हॉईस ऑफ मीडिया या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने पुढाकार घेऊन पत्रकारितेमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य शाबूत कसे राहील यासाठी पुढाकार घेत आहे. या संदर्भामध्ये स्वतंत्र सेलची स्थापना केलेली आहे. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची स्थापना होऊन त्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी नवीन पदाधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे. पत्रकारिता करत असताना निर्भीडपणे बातमी दिली जावी. ती बातमी छापून आल्यावर त्या पत्रकाराच्या मागे खंबीरपणे ती पत्रकार संस्था उभी राहावी, पत्रकारांवर हल्ले होतात तेव्हा पत्रकारावर गुन्हे
दाखल होतात जेव्हा पत्रकारांना कोर्टामध्ये खेचले जाते, हे सगळे करत असताना व्हाईस ऑफ मीडिया त्या पत्रकाराच्या मागे खंबीरपणे उभे राहणार आहे. या संदर्भात व्हाईस ऑफ मिडिया स्वतंत्र पॉलिसी तयार करणार आहे.

 

शब्दांकन

मा.संदीप जी काळे

राष्ट्रीय अध्यक्ष

व्हाईस ऑफ मीडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *