सिव्हिल डिफेन्सचे प्रशिक्षण हे केवळ प्रमाणपत्रापुरते मर्यादित नसून समाजसेवेची मोठी जबाबदारी आहे-आ. संजयजी केळकर ,ठाणे येथे सिव्हिल डिफेन्स प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण….
![]()
सिव्हिल डिफेन्सचे प्रशिक्षण हे केवळ प्रमाणपत्रापुरते मर्यादित नसून समाजसेवेची मोठी जबाबदारी आहे-आ. संजयजी केळकर
ठाणे येथे सिव्हिल डिफेन्स प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण….
ठाणे (प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाच्या सिव्हिल डिफेन्स कॉर्प्सतर्फे आयोजित बेसिक प्रशिक्षण कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आरएसपी अधिकारी वर्गाला मुख्य क्षेत्ररक्षक नागरिक संरक्षण ठाणे तथा आमदार संजयजी केळकर यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम ठाणे पश्चिम येथील तीन हात नाका, एलबीएस मार्गावरील वाहतूक नियंत्रण कक्षाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
५ जून २०२४ ते ९ जून २०२४ या कालावधीत कल्याण येथील ब्राइटन वर्ल्ड स्कूलमध्ये हा प्रशिक्षण कोर्स आयोजित करण्यात आला होता. प्रशिक्षणादरम्यान आपत्ती व्यवस्थापन, नागरिक संरक्षण तसेच आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘सेकंड क्लास’ श्रेणीसह प्रमाणपत्र देण्यात आले. हे प्रमाणपत्र सिव्हिल डिफेन्स, ठाणे विभागामार्फत देण्यात आले असून उपनियंत्रक नागरी संरक्षण ठाणे श्री.विजय बी. जाधव तसेच जिल्हाधिकारी तथा सिव्हिल डिफेन्स नियंत्रक अशोक शिनगारे यांच्या स्वाक्षऱ्या त्यावर आहेत.
कार्यक्रमाला उपनियंत्रक नागरी संरक्षण ठाणे विजय बी. जाधव, सहाय्यक उपनियंत्रक नागरी संरक्षण ठाणे अनिल गावीत, उपायुक्त क्षेत्ररक्षक नागरी संरक्षण ठाणे कमलेश श्रीवास्तव, उपायुक्त क्षेत्ररक्षक नागरी संरक्षण ठाणे करमबिर सिंग भुर्जी, विभागीय क्षेत्ररक्षक नागरी संरक्षण ठाणे डॉ. किशोर अढळकर, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा प्रसिद्धी प्रमुख आरएसपी डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील, नोडल ऑफिसर तथा विभागीय समादेशक डॉ.श्री.मनीलाल रतिलाल शिंपी, जिल्हा समादेशक जितेंद्र सोनवणे,सुभाष गायकवाड (समादेशक कल्याण पूर्व) बाळा साठे (समादेशक ठाणे शहर)
निलेश नरवडे (समादेशक भिवंडी शहर) आदी मान्यवर व मोठ्या संख्येने आर एस पी अधिकारी उपस्थित होते. तसेच विविध विभागांतील समादेशक व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनीलाल शिंपी यांनी केले. सूत्रसंचालन आरएसपी अधिकारी संदीप पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनिल गावीत यांनी केले. कार्यक्रम आ. संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
स्थानिक पातळीवर या उपक्रमाचे स्वागत होत असून, प्रशिक्षित स्वयंसेवक आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
“सिव्हिल डिफेन्सचे प्रशिक्षण हे केवळ प्रमाणपत्रापुरते मर्यादित नसून समाजसेवेची मोठी जबाबदारी आहे. आपत्तीच्या काळात सर्वप्रथम धावून जाणारे स्वयंसेवक म्हणजे सिव्हिल डिफेन्सचे प्रशिक्षित जवान.
आज प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व अधिकारी वर्गाने मिळवलेले ज्ञान प्रत्यक्ष कार्यात उतरवणे अत्यंत गरजेचे आहे. ठाणे शहरासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात आपत्ती व्यवस्थापनाची सज्जता अत्यावश्यक आहे.
आपण सर्वांनी समाजाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहावे, हीच अपेक्षा. शासन आणि प्रशासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे,” असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी यावेळी केले.

