अक्षय तृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी अमळनेरमध्ये सतर्कता मोहीम – पोलिस, पुरोहित व ‘आधार’ संस्थेचा संयुक्त पुढाकार
![]()
अक्षय तृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी अमळनेरमध्ये सतर्कता मोहीम – पोलिस, पुरोहित व ‘आधार’ संस्थेचा संयुक्त पुढाकार
अमळनेर प्रतिनिधी
जळगाव जिल्हाधिकारी मा रोहन घुगे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलीस स्टेशन व आधार बहुउद्देशीय संस्था यांनी मिळून अंमळनेर येथील पुरोहित संघ यांची पंचायत समिती साने गुरुजी सभागृहामध्ये मीटिंग संपन्न झाली.
बालविवाह विरोधात सतर्कता अभियान धर्मगुरू पुरोहित यांच्या सहाय्याने राबविण्यात येत आहे
अक्षय तृतीय मुहूर्तावर विवाह होतील त्यामध्ये विशेषता मुला मुलींचे वय हे पडताळण्यात यावे तसेच दोघांचे आधार कार्ड, शाळेचा दाखला व जन्म दाखला बघूनच मुहूर्त सुचवावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी अमळनेर शहरातील पोलीस स्टेशनच्या पीएसआय कविता ठाणगे यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा व पोस्को ॲक्ट बद्दल माहिती दिली तसेच बालविवाह घडवून आणल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सूचित केले. पोलिस कॉन्स्टेबल शामल पारधी यांची उपस्थिती होती.
आधार संस्था संचालक रेणू प्रसाद यांनी बालविवाह बद्दल व बाल तस्करी ,लैंगिक शोषण, बालकामगार यावर माहिती सांगितली.
हे अभियान जिल्ह्यात देखील सतर्कतेने राबविले जावे या संदर्भात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री ऋषिकेश काळे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.
आधार बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष डॉ.भारती पाटील, संचालक रेणू प्रसाद, जस्ट राईट फॉर चिल्ड्रन प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, मोहिनी धनगर, दीपक विश्वेश्वर, उर्जिता शिसोदे, दीप्ती गायकवाड, अश्विनी भदाणे, भावना सूर्यवंशी सहभागी झाले.
पुरोहित संघाचे निलेश जोशी, श्रीकांत पाठक, हरिश्चंद्र जोशी, प्रफुल जोशी, अरविंद नाईक, अक्षय नाईक, ज्ञानेश्वर भावे, प्रदीप कुमार जोशी, प्रशांत जोशी, महेश कुलकर्णी, नंदकुमार जहांगीदार, सुनील जोशी, सारंग गर्गे, मंगेश काळकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

