दिखाव्याला भुलली तरुणी; अमळनेर समितीने वाचवला आयुष्याचा मोठा निर्णय
1 min read

दिखाव्याला भुलली तरुणी; अमळनेर समितीने वाचवला आयुष्याचा मोठा निर्णय

Loading

दिखाव्याला भुलली तरुणी; अमळनेर समितीने वाचवला आयुष्याचा मोठा निर्णय

अमळनेर प्रतिनिधी.
उच्च शिक्षण, अमाप शेती आणि त्याचे कडे असलेल्या लक्झरी गाड्या… या सर्व प्रलोभनांना बळी पडून घाईघाईने प्रेमविवाह करणाऱ्या एका तरुणीची मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, अमळनेरच्या महिला अन्याय विरोधी समितीच्या तत्परतेमुळे या तरुणीचा विवाह कायदेशीररीत्या ‘शून्यवत’ (Null and Void) करण्यात यश आले असून, तिला ‘घटस्फोटित’ हा शिक्का लागण्यापासून वाचवण्यात आले आहे. या कामी ऍड सारांश सोनार यांचे मार्गदर्शन लाभले.
धुळे जिल्ह्यातील प्रतिभा (नाव बदललेले) हिची ओळख किरण नावाच्या तरुणाशी झाली. किरण दरवेळी भेटीला येताना नवीन महागडी गाडी घेऊन येत असे. “घरात ८-१० गाड्या आहेत, खूप शेती आणि मोठे उद्योग आहेत,” असे सांगून त्याने प्रतिभावर प्रभाव टाकला. आपल्या पालकांचा विरोध डावलून प्रतिभाने किरणसोबत विवाह केला.
मात्र विवाहानंतर अवघ्या आठच दिवसात किरणचे वास्तव समोर आले. त्याचे शिक्षण केवळ १२ वी झाले होते, तो भाड्याच्या घरात राहत होता आणि ज्या गाड्या तो मिरवत होता त्या सर्व भाड्याने आणलेल्या होत्या. इतकेच नव्हे तर, घराबाहेर उधारी घेणाऱ्या लोकांचा राबता पाहून प्रतिभाला आपली फसवणूक झाल्याची खात्री पटली.
बदनामीच्या भीतीने खचलेल्या प्रतिभाने अखेर पालकांच्याच मदतीने ‘अमळनेर महिला अन्याय विरोधी समितीकडे धाव घेतली. समितीने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांच्या मदतीने किरण आणि त्याच्या साथीदारांना चांगलाच पाहुणचार दिला व
​भविष्यात कोणाचीही फसवणूक करणार नाही, असा लेखी मुचलका त्यांच्याकडून लिहून घेतला.
​विवाह नोंदणी झाली असली तरी, कायदेशीर मार्ग अवलंबून हा विवाह ‘शून्यवत’ करून घेतला, जेणेकरून तरुणीला घटस्फोटाच्या लांबलचक प्रक्रियेतून जावे लागू नये.
​”तरुणाईने कोणत्याही प्रलोभनाला किंवा श्रीमंतीच्या बडेजावाला बळी पडू नये. आयुष्याचा मोठा निर्णय घेताना जोडीदाराची पूर्ण चौकशी करणे आवश्यक आहे, अन्यथा अशी फसगत होऊ शकते. असा सल्ला महिला अन्याय विरोधी समितीचे वतीने देण्यात आला आहे.
​या यशस्वी मोहिमेत धनंजय सोनार यांच्यासह मंगला विसपुते, निशा विसपुते, अरुण नलावडे मुंबई, संजय मोरे ठाणे, श्रेया सिरसाठ ठाणे, निवृत्त फौजदार बाळकृष्ण शिंदे, राजकुमार कोराणी, विनोद रावूळ आणि अनिल चौधरी यांनी मोलाचे सहकार्य केले. समितीने मदत व सहकार्य करणाऱ्या पोलीस प्रशासन, विवाह निबंधक व संबंधित यंत्रणेचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *