“भाऊ मालदार चहा”ची यशोगाथा – सारंग महाजन व विशाल देवरे यांना राज्यस्तरीय सन्मान
![]()
“महाराष्ट्र उद्योग सन्मान २०२६” जाहीर : पारोळ्याच्या उद्योजकांची राज्यस्तरावर दमदार छाप!
अमळनेर प्रतिनिधी
Proven Pathways (OPC) Pvt. Ltd. तर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार २०२६” यंदा जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरातील प्रगत उद्योजक सारंग नामदेव महाजन आणि विशाल देविदास देवरे यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
पारोळा येथील ओम उद्योग समूह आणि लोकप्रिय “भाऊ मालदार चहा” या ब्रँडच्या माध्यमातून त्यांनी उद्योग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. उत्कृष्ट दर्जा, ग्राहकांचा विश्वास आणि नाविन्यपूर्ण सेवा या त्रिसूत्रीवर आधारित व्यवसाय उभारून त्यांनी चहा उद्योगात विशेष यश मिळवले आहे. सातत्यपूर्ण प्रगती आणि गुणवत्तेची जपणूक यामुळे त्यांचे नाव राज्यभरात गाजत आहे.
या पुरस्काराद्वारे त्यांच्या व्यावसायिक कौशल्याची, कष्टाची आणि देशाच्या आर्थिक प्रगतीत दिलेल्या योगदानाची अधिकृत पावती मिळाली आहे. त्यांच्या यशोगाथेमुळे स्थानिक तरुणांमध्ये उद्योजकतेबद्दल नवा आत्मविश्वास निर्माण होत असून, ‘स्वतःचा व्यवसाय उभारण्याची’ प्रेरणा मिळत आहे.
दरम्यान, या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यातही ते अशाच प्रकारे प्रगतीची नवी उंची गाठतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

