आखाजी महोत्सवा’त अमळनेरच्या माळी समाजाच्या महिलांचा जलवा; गौराई आरास स्पर्धेत द्वितीय क्रमांकाची मानाची कामगिरी
1 min read

आखाजी महोत्सवा’त अमळनेरच्या माळी समाजाच्या महिलांचा जलवा; गौराई आरास स्पर्धेत द्वितीय क्रमांकाची मानाची कामगिरी

Loading

‘आखाजी महोत्सवा’त अमळनेरच्या माळी समाजाच्या महिलांचा जलवा; गौराई आरास स्पर्धेत द्वितीय क्रमांकाची मानाची कामगिरी

अमळनेर प्रतिनिधी :
खान्देश साहित्य संघ, जळगाव शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या खान्देशातील पहिल्या “आखाजी महोत्सवा”त अमळनेर येथील माळी समाजाच्या माता-भगिनींनी आपल्या कलेचा ठसा उमटवत उल्लेखनीय यश संपादन केले. पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट सादरीकरण केले आणि समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
या महोत्सवातील ‘गौराई आरास स्पर्धेत’ अमळनेरच्या पथकाने द्वितीय क्रमांक पटकावत सर्वांचे लक्ष वेधले. या यशस्वी पथकाचे नेतृत्व सौ. किर्ती विकास शेलकर यांनी केले. पथकातील सदस्यांमध्ये सौ. भिकुबाई भगवान महाजन, सौ. कलाबाई रतिलाल महाजन, गं.भा. लक्ष्मीबाई दशरथ महाजन, सौ. मोनाली भरत महाजन, सौ. योगिता नितीन महाजन आणि आरोही महेंद्र महाजन यांचा समावेश होता.
याशिवाय, त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल पथकाला प्रोत्साहनपर बक्षीसही प्राप्त झाले. या यशामुळे अमळनेरच्या माळी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व स्तरातून विजेत्यांचे कौतुक होत आहे.
समाजाच्या वतीने सर्व विजेत्या महिलांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या या यशामुळे पारंपरिक कलेला नवी उभारी मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. हा महोत्सव महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा ठरला असून, अमळनेरच्या सावित्रीच्या लेकींनी पुन्हा एकदा आपली प्रतिभा सिद्ध केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *