सत्ता भाषणात रमली; जनता मात्र प्रश्नांच्या आगीत होरपळली!  ,महागाईपासून पेपरफुटीपर्यंत प्रत्येक प्रश्नावर सरकारला उत्तर मागणारी जनजागृती मोहीम चर्चेत
1 min read

सत्ता भाषणात रमली; जनता मात्र प्रश्नांच्या आगीत होरपळली! ,महागाईपासून पेपरफुटीपर्यंत प्रत्येक प्रश्नावर सरकारला उत्तर मागणारी जनजागृती मोहीम चर्चेत

Loading

सत्ता भाषणात रमली; जनता मात्र प्रश्नांच्या आगीत होरपळली!

महागाईपासून पेपरफुटीपर्यंत प्रत्येक प्रश्नावर सरकारला उत्तर मागणारी जनजागृती मोहीम चर्चेत

 

 

 

 

 

अमळनेर प्रतिनिधी :
सध्या सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या एका जनजागृती पोस्टरमुळे महागाई, बेरोजगारी, परीक्षा पेपरफुटी तसेच मंदिरांमधील चोरीसारख्या विषयांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पोस्टरमध्ये “मन की बात चुप क्यूँ है?” असा सवाल उपस्थित करत महागाई, राम मंदिर चोरी, बेरोजगारी, परीक्षा पेपरफुटी आणि सोनम वांगचुक उपोषण यांसारख्या मुद्द्यांवर सरकारने मौन का बाळगले आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
याबाबत शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनीही या मोहिमेला पाठिंबा दर्शवत, “जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, कायदा-सुव्यवस्था यांसारख्या गंभीर प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घेऊन उत्तर द्यावे. लोकांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा होणे ही लोकशाहीची गरज आहे,” असे मत व्यक्त केले.
वाढती महागाई, रोजगाराच्या संधींचा अभाव, विविध स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटना आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत उपस्थित होणारे प्रश्न यामुळे सामान्य नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे अनेक सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे. विरोधी पक्षांसह विविध संघटनांनीही या मुद्द्यांवर सत्ताधारी सरकारवर सातत्याने टीका केली असून, केवळ घोषणांपेक्षा ठोस कृतीची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पोस्टरमुळे नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी याला जनभावनांचे प्रतिबिंब म्हटले असून, सरकारने जनतेच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्नांवर अधिक लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर काहींनी पोस्टरमधील दाव्यांवर वेगवेगळी मते नोंदवत वस्तुनिष्ठ चर्चेची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, या पोस्टरद्वारे उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांमुळे राज्यासह देशातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा महागाई, रोजगार, शिक्षण व्यवस्था आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारने या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *