खान्देशातील पहिला ‘आखाजी महोत्सव’ रंगला; अमळनेरच्या माळी समाजाच्या सावित्रीच्या लेकींची दैदिप्यमान कामगिरी
1 min read

खान्देशातील पहिला ‘आखाजी महोत्सव’ रंगला; अमळनेरच्या माळी समाजाच्या सावित्रीच्या लेकींची दैदिप्यमान कामगिरी

Loading

खान्देशातील पहिला ‘आखाजी महोत्सव’ रंगला; अमळनेरच्या माळी समाजाच्या सावित्रीच्या लेकींची दैदिप्यमान कामगिरी

अमळनेर प्रतिनिधी
: खान्देश साहित्य संघ, जळगाव शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या खान्देशातील पहिल्या “आखाजी महोत्सवा”त अमळनेर येथील माळी समाजाच्या माता-भगिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या कलेचा ठसा उमटवला. विविध पारंपरिक स्पर्धांमध्ये सहभाग घेत त्यांनी उत्कृष्ट सादरीकरणातून समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
या महोत्सवातील ‘जात्यावरच्या ओव्या (गाणी)’ स्पर्धेत सौ. चित्रकला प्रकाश महाजन व सौ. रंजना मनोहर महाजन यांनी प्रथम क्रमांक पटकावत उपस्थितांची दाद मिळवली. तर सौ. भारती शांताराम चव्हाण व सौ. मनीषा मधुकर महाजन यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवून आपली कला सिध्द केली.
तसेच, ‘गोवराई आरास’ स्पर्धेत सौ. किर्ती विकास शेलकर (गटप्रमुख) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने द्वितीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी बजावली. या पथकात सौ. भिकुबाई भगवान महाजन, सौ. लक्ष्मीबाई दशरथ महाजन, सौ. कलाबाई रतीलाल महाजन, सौ. मोनाली भरत महाजन, सौ. योगिता नितीन महाजन, सौ. ज्योती महेंद्र महाजन आणि सौ. वैशाली संजय महाजन यांचा समावेश होता.
याशिवाय, उत्कृष्ट सादरीकरणासाठी सौ. ज्योती प्रकाश महाजन, सौ. जागृती महाजन, सौ. सुवर्णा महाजन आणि सौ. कविता महाजन यांना प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या सर्व यशस्वी स्पर्धकांचे क्षत्रिय काच माळी समाज पंच मंडळ, अमळनेर तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ, अमळनेर यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

हा महोत्सव केवळ स्पर्धांचा नव्हे, तर पारंपरिक संस्कृती, कला आणि महिलांच्या सशक्त सहभागाचा एक सुंदर संगम ठरला. अमळनेरच्या सावित्रीच्या लेकींनी आपल्या कर्तृत्वाने खान्देशाच्या सांस्कृतिक विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *