महात्मा फुले द्विशताब्दी वर्षानिमित्त धुळ्यात अभिनव उपक्रम; दररोज पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन
![]()
महात्मा फुले द्विशताब्दी वर्षानिमित्त धुळ्यात अभिनव उपक्रम; दररोज पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन
धुळे प्रतिनिधी :
अखिल भारतीय माळी महासंघ, धुळे महानगर शाखेच्या वतीने महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त एक अभिनव व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत धुळे शहरातील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास दररोज सकाळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जात आहे.
महात्मा फुले यांच्या कार्याची आणि विचारांची सतत आठवण राहावी तसेच समाजात त्यांच्या कार्याची जागृती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या संकल्पनेची मांडणी अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विलासराव पाटील यांनी केली असून त्यांच्या सूचनेला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
या उपक्रमासाठी धुळे शहरातील विविध मान्यवर, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी वर्गणीच्या स्वरूपात सहकार्य केले आहे. यामध्ये श्री. विलासराव पाटील (राष्ट्रीय अध्यक्ष), सौ. तारकाबाई सुभाषचंद्र विवरेकर (विश्वस्त), श्री. काशिनाथ माळी (राष्ट्रीय सचिव), श्री. हरीशचंद्र रेंडे (महानगराध्यक्ष), श्री. चैत्राम भदाणे (ज्येष्ठ नागरिक आघाडी), श्री. राजेंद्र गवळे (कार्याध्यक्ष, धुळे महानगर), श्री. रत्नाकर नाना माळी (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते), श्री. किशोर माळी गुरुजी (अध्यक्ष, कर्मचारी आघाडी), प्रा. नामदेव माळी, श्री. राजेंद्र माळी म्हसाळे (विभागीय अध्यक्ष, कर्मचारी आघाडी), श्री. संदीप माळी, श्री. बापू महाजन (विभाग प्रमुख, मोगलाई) तसेच श्री. न्हानु माळी गुरुजी (अध्यक्ष, आध्यात्मिक आघाडी) आदींचा समावेश आहे.
या उपक्रमामुळे समाजात महात्मा फुले यांच्या विचारांची जागृती होऊन नवीन पिढीला प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. धुळेकर नागरिकांकडून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, भविष्यातही अशा उपक्रमांची अपेक्षा व्यक्त होत आहे.

