आमदार अनिल पाटील यांनी घेतला शेत पानंद रस्त्यांच्या कामांचा सखोल आढावा  टँकर मागणीच्या प्रस्तावांना चारच मंजुरी द्या-आमदारांचे आढावा बैठकीत निर्देश
1 min read

आमदार अनिल पाटील यांनी घेतला शेत पानंद रस्त्यांच्या कामांचा सखोल आढावा टँकर मागणीच्या प्रस्तावांना चारच मंजुरी द्या-आमदारांचे आढावा बैठकीत निर्देश

Loading

आमदार अनिल पाटील यांनी घेतला शेत पानंद रस्त्यांच्या कामांचा सखोल आढावा

टँकर मागणीच्या प्रस्तावांना चारच मंजुरी द्या-आमदारांचे आढावा बैठकीत निर्देश

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर तालुक्यातील विकासकामांना गती देण्यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना अंतर्गत महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली.
या बैठकीत आमदारांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पानंद रस्त्यांच्या कामांचा सखोल आढावा घेतला. तसेच आगामी उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या परिस्थितीवरही गांभीर्याने चर्चा करण्यात आली. नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले. विशेषतः टँकर मागणी संदर्भात प्राप्त झालेल्या तसेच येणाऱ्या सर्व प्रस्तावांना केवळ चार दिवसांच्या आत मंजुरी देण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना देत प्रशासनाला गती देण्यावर भर देण्यात आला. यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.
सदर बैठकीत विविध विभागांचे अधिकारी,उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी, बांधकाम, भूमी अभिलेख, पोलीस प्रशासन तसेच पंचायत समितीचे अधिकारी यांनी आपापल्या विभागाचा आढावा सादर केला.समन्वयातून कामे जलदगतीने पूर्ण करण्यावर सर्वांनी एकमत व्यक्त केले. तसेच समिती सदस्य व ग्रामस्थ प्रतिनिधी आपल्या भागातील अडचणी मांडल्या, त्यावर आमदारांनी सकारात्मक भूमिका घेत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
ही बैठक म्हणजे केवळ आढावा नव्हे, तर शेतकरी व ग्रामीण विकासासाठी घेतलेली ठोस दिशा देणारी पावले असल्याचे स्पष्ट झाले.
सदर बैठकीत मयूर भंगाळे (उपविभागीय अधिकारी अमळनेर), रुपेश कुमार सुराणा (तहसीलदार अमळनेर), डॉ.उल्हास देवरे (तहसीलदार पारोळा), एन.आर पाटील (गटविकास अधिकारी अमळनेर), विजयकुमार देवरे (उपअधीक्षक भूमी अभिलेख पारोळा), भूषण कदम (गटविकास अधिकारी पारोळा), नीना बाविस्कर (सा.का अधिकारी पारोळा), वैशाली जडे (शाखा अभियंता पंचायत समिती पारोळा), आकाश भाई (ए.पी.ओ पंचायत समिती पारोळा), एस.एस खर्डे (विस्तार आधिकारी पंचायत समिती अमळनेर), डी.जी जाधव (मं.कं अ पारोळा), प्रकाश चव्हाण (पोलीस उपनिरीक्षक अमळनेर- एस डी पी ओ कार्यालय), महेश जाधव (सहायक म.अधिकारी पारोळा), ए.जे.परदेशी (सहाय्यक म. अधिकारी अमळनेर), जितेंद्र बुवा (ए.पी ओ रोजगार हमी योजना पारोळा), वाय.ए.वंजारी (उप कृषी अधिकारी अमळनेर), ए.आर कोठावदे (उप कृषी अधिकारी अमळनेर ), एस.पी.गावित (उपअधीक्षक भूमी अभिलेख अमळनेर), एस.बी.देसले (आर.एफ.ओ पारोळा), एम.डी चव्हाण (एच.क्यू.ए), एच.के.पाटील (उपअभियंता बां.वि. जिल्हा परिषद अमळनेर), पी.ए.पाटील (उपविभागीय सनियंत्रण अधिकारी सा.बां.), गांगुर्डे साहेब (उपविभागीय सनियंत्रण अधिकारी सा.बां.), एस.व्हि.पाटील (ज्युनिअर इंजिनिअर पीडब्ल्यूडी पारोळा) इत्यादी अधिकारी वर्गासह अनिल सिसोदे (समिती सदस्य), रिता बाविस्कर (समिती सदस्य), गौरव उदय पाटील (समिती सदस्य), चेतन काशिनाथ पाटील (समिती सदस्य), महारु आत्माराम पाटील (ग्रामस्थ), सुरेश देवचंद पाटील (ग्रामस्थ), ललित भूपेंद्र बाविस्कर (ग्रामस्थ) आदी उपस्थित होते.
दरम्यान शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पाणी टंचाईवर मात आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ही बैठक अत्यंत फलदायी ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *