जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब येथे दंतचिकित्सा शिबिर संपन्न
![]()
जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब येथे दंतचिकित्सा शिबिर संपन्न
अमळनेर प्रतिनिधी(प्रा.संदीप महाजन)
जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब येथे दंतचिकित्सा शिबिर संपन्न नुकतेच संपन्न झाले.जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर विविध सामाजिक बांधिलकीचे उपक्रम मानव कल्याणाच्या दृष्टिकोनातून सातत्याने राबवत असते. त्यात शैक्षणिक, आरोग्य विषयक, शेतकऱ्यांसाठी व पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी नेहमीच अग्रणी असते. त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब येथे दंत चिकित्सा उपक्रम घडवून आणला. या उपक्रमात प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या तब्बल 200 विद्यार्थी व गावातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. जायन्ट्स ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टंग क्लीनर व औषधी मुख्याध्यापक तसेच लोकमत वेब पोर्टल चे वार्ताहर बापूसाहेब ए बी चौधरी सर यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.
या उपक्रमाच्या संयोजनासाठी प्रा. पी. आर. भावसार सर, प्रा. यू. जी. देशपांडे सर, प्रा. चंद्रलाल बडगुजर सर व प्रा. ए. एम. करमपुरवाला सर,संस्थापक अध्यक्ष तथा युनिट ऑफिस डॉ सुनील पाटील सर, जायंट्स ग्रुप अध्यक्ष डॉ. महेश रमन पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नंदादीप विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब ए. बी. चौधरी सर यांच्या हस्ते उपस्थित सर्व पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष डॉ. महेश रमण पाटील, उपाध्यक्ष तथा नंदादीप विद्यालयाचे चेअरमन आबासाहेब ॲड. राजेंद्र भगवान चौधरी, संजय मुंडके, सेक्रेटरी संदीप महाजन, प्रदीप शिंगाणे, ज्ञानेश्वर ओंकार पाटील, हिरालाल कोळी आणि श्रीराम नारायण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे शिबिराला एक वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त झाली.
या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांची दातांची तपासणी करण्यात आली तसेच तोंडाच्या आरोग्याबाबत प्रोजेक्ट चेअरमन डॉ.निलेश शिंगणे यांनी मार्गदर्शन केले. दंत आरोग्याचे महत्त्व, योग्य ब्रशिंग पद्धत व नियमित तपासणीची गरज याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.
जायन्ट्स ग्रुप च्या वतीने आपल्या मनोगतात संदिप महाजन सर यांनी सोन्याचे दात, चांदीचे केसं, व रक्तात साखर हे सुदृढ आरोग्याचे लक्षण नव्हे. त्यासाठी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे नमूद केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षक राहुल पाटील सर, संतोष सुतार सर, सुनील शिंगाने सर,विश्वासराव चौधरी सर, शिक्षकेतर कर्मचारी विलास पाटील,भोलेनाथ चौधरी, योगेश चौधरी यांनी परिश्रम घेतले. तर सूत्रसंचालन अविनाश पाटील सर यांनी केले.

