आर एस पी हे केवळ प्रशिक्षण नसून एखाद्या घरामध्ये झोपडी मध्ये संस्काराचा चांगला दिवा लावण्याचे काम आपण करू शकता – ज्ञानेश्वर धानवे  ठाणे वाहतूक उप आयुक्तालयामार्फत आर एस पी अधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
1 min read

आर एस पी हे केवळ प्रशिक्षण नसून एखाद्या घरामध्ये झोपडी मध्ये संस्काराचा चांगला दिवा लावण्याचे काम आपण करू शकता – ज्ञानेश्वर धानवे ठाणे वाहतूक उप आयुक्तालयामार्फत आर एस पी अधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

Loading

आर एस पी हे केवळ प्रशिक्षण नसून एखाद्या घरामध्ये झोपडी मध्ये संस्काराचा चांगला दिवा लावण्याचे काम आपण करू शकता – ज्ञानेश्वर धानवे

ठाणे वाहतूक उप आयुक्तालयामार्फत आर एस पी अधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

ठाणे:(मनिलाल शिंपी)महाराष्ट्र पोलीस विभाग व शिक्षण विभाग अंतर्गत ठाणे विभागासाठी रस्ता सुरक्षा अभियान विषयाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या आदेशानुसार, व ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी देवीदास महाजन व जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, विभागीय समन्वय अधिकारी डॉ.मनिलाल रतीलाल शिंपी व नोडल ऑफिसर श्री. दिलीप स्वामी यांच्या नेतृत्वाखाली आर एस पी शिक्षक अधिकारी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन बुधवार दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी वाहतूक नियंत्रण कक्ष तीन हात नाका,एलबीएस मार्ग,ठाणे पश्चिम येथे पोलीस निरीक्षक वाहतूक प्रशासन श्री.ज्ञानेश्वर धानवे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहन वातावरणात संपन्न झाले.
प्रशिक्षणाच्या पहिल्या स्तरात प्रशिक्षणार्थी आर एस पी अधिकारी शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये *ट्रॅफिक सेन्स* निर्माण होण्यासाठी तसेच रस्ता अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी
*रस्ता सुरक्षा व नागरी संरक्षण* विषयाची गरज व महत्त्व विभागीय समन्वय अधिकारी ( नोडल ऑफिसर) डॉ.मनिलाल शिंपी यांनी आपल्या प्रास्ताविकातून माहिती दिली.तसेच अभ्यासक्रमाबाबत सविस्तर माहिती विभागीय समन्वय अधिकारी श्री. दिलीप स्वामी यांनी दिली.

 

मी दररोज ज्ञानदानाचे काम करतो आजही मला वाटते शिक्षक होऊन ज्ञानदानाचे काम करावे. हे केवळ प्रशिक्षण म्हणून समजू नका तुमच्या या एखाद्या ट्रेनिंग मुळे, एखाद्या मीटिंग मुळे, एखाद्याचे आयुष्य घडू शकते किंवा एखादा मोठा अपघात टाळण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे एक कुटुंब वाचू शकते. इतकं मोठं पवित्र काम करण्याची संधी तुम्हाला रोज मिळावी. तुम्ही दररोज ज्ञानदानाचे काम करता व इतकी चांगली नोकरी तुम्ही करत आहात, मला जर कोणी सांगितले तर आत्ता मी शिक्षक व्हायला तयार आहे. कारण मी एका शिक्षकाचा मुलगा आहे याचा मला अभिमान आहे. तसेच खूप मोठी एक सामाजिक जबाबदारी तुमच्यावर आहे. समाज घडविण्याची, पिढी घडवण्याची या सगळ्या गोष्टी तुम्ही पॉझिटिव्ह घ्या, आपल्या शाळेतून एखादा विद्यार्थी खूप मोठा अधिकारी झाला तर आपण शिक्षक म्हणून आपल्याला अभिमान वाटतो. मात्र त्याच शाळेतला एखादा विद्यार्थी चुकीच्या मार्गाने काम करत असेल मग तो पण आपलाच विद्यार्थी आहे ना, मग तो बिघडला तर त्याची जबाबदारी कोणाकडे? एकाच वर्गातला कलेक्टर होतो, एकाच वर्गातला चुकीच्या मार्गावर जातो मग आपण शिक्षक म्हणून स्वतःला आरशात पाहिले पाहिजे. यासाठी आपण एक चांगला नागरिक म्हणून विद्यार्थ्यांना घडविले पाहिजे. तेव्हाच आपण अभिमानाने सांगू शकतो की, माझा विद्यार्थी हा या देशाचा एक चांगला नागरिक बनला आहे. ५० शिक्षकांच्या माध्यमातून एक एक जरी होणारी दुर्घटना वाचली तर ५० जीव तुम्ही वाचवले असे मी समजेन व या प्रशिक्षणाचे काहीतरी फलित झाले असे मी समजेन. चांगला गुरु होण्यासाठी चांगला विद्यार्थी होणे आवश्यक आहे. त्यामुळे मी स्वतःला विद्यार्थी समजून नवीन नवीन गोष्टी शिकत असतो म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो की, विद्यार्थ्यांना सांगा तू कोणता अधिकारी झाला नाही तरी चालेल मात्र आरोपी होऊ नकोस… त्याचबरोबर
हे केवल प्रशिक्षण नसून एखाद्या घरामध्ये झोपडी मध्ये संस्काराचा चांगला दिवा लावण्याचे काम आपण करू शकता असे पोलीस निरीक्षक वाहतूक प्रशासन श्री.ज्ञानेश्वर धानवे यांनी मार्गदर्शन करताना सांगितला.यावेळी
ठाणे जिल्हा समन्वय अधिकारी जितेंद्र सोनवणे, आर एस पी अधिकारी निलेश नरवडे, कळवा विभाग समादेशक संजय खैरनार, यांनी शिक्षक अधिकारी यांची नोंदणी पूर्ण केली.
तिसऱ्या सत्रामध्ये प्रशिक्षण मैदानावर . प्रशिक्षक डीआय विकास मोरे यांनी मैदानी प्रशिक्षण कसे असेल याबाबत माहिती दिली. प्रशिक्षण ठिकाणी प्रसिद्धी प्रमुख तथा दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांनी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. तसेच या प्रशिक्षणासाठी आर एस पी युनिट चे मार्गदर्शक समाजसेवक माणिक पाटील यांचे बहुमूल्य अनमोल असे सहकार्य मिळत आहे.प्रशिक्षणार्थी शिक्षकांना जास्तीत जास्त सखोल माहिती मिळावी यासाठी विशेष तज्ञ व्यक्तीकडून प्रॅक्टीकलसह माहिती देण्यासाठी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धानवे ,ऑफिस ॲडमिस्ट्रेटर चाबुकसर मेजर, यांच्याकडून चांगल्या प्रकारे नियोजन केले आहे.प्रशिक्षण यशस्वीतेसाठी ठाणे शहर समन्वय अधिकारी बाळा साठे, सतीश पाटील, श्रीमती पौर्णिमा पाटील, संतोष भोईर,प्रा.सुभाष गायकवाड, विशेष परिश्रम घेत आहेत. प्रशिक्षणाचे सूत्र संचलन सदाशिव गारळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *