ज्ञानदा सायन्स क्लासेसचा दिमाखदार गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न, इयत्ता ५ वी ते १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; विज्ञान-शिक्षणाच्या महत्त्वावर मान्यवरांचे मार्गदर्शन
![]()
ज्ञानदा सायन्स क्लासेसचा दिमाखदार गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न,
इयत्ता ५ वी ते १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; विज्ञान-शिक्षणाच्या महत्त्वावर मान्यवरांचे मार्गदर्शन
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहरातील ज्ञानदा सायन्स क्लासेसतर्फे इयत्ता ५ वी ते १२ वीतील विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेत तसेच विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास पालक, विद्यार्थी आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक श्री. रविबापू होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर तालुका विज्ञान मंडळाचे सचिव व शहापूर हायस्कूलचे विज्ञान शिक्षक श्री. आर. एस. पाटील सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. कु. नक्षत्रा दुसाने आणि कु. श्रद्धा पाटील यांनी सुमधुर स्वागतगीत सादर करून मान्यवरांचे आणि उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेत केमिस्ट्री विषयात अमळनेर तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या कु. अंकिता सांगोळे हिला विशेष प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर ज्ञानदा टॅलेंट सर्च, NMMS, स्कॉलरशिप परीक्षा तसेच विज्ञान रांगोळी स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी आर्यन वानखेडे, निशांत पाटील, अंकिता सांगोळे, वेदांत सांगोरे, नेहा पाटील, मंथन पाटील, लावण्या पाटील, मानसी पाटील, दिक्षिता पाटील, मोक्षदा पाटील आणि सुकेशनी सपकाळे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत क्लासच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
पालक प्रतिनिधी म्हणून श्री. शांतीलाल पाटील, सौ. चौधरी मॅडम, श्री. समाधान सपकाळे आणि श्री. दत्तू कोळी सर यांनी ज्ञानदा क्लासेसच्या दर्जेदार अध्यापन पद्धतीचे व विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या योग्य मार्गदर्शनाचे मनापासून कौतुक केले.
प्रमुख पाहुणे श्री. आर. एस. पाटील सर यांनी विज्ञान व गणित विषयाचे जीवनातील महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना अभ्यासात सातत्य ठेवण्याचे आवाहन केले. अध्यक्ष श्री. रविबापू यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा सल्ला देत, उत्तम नागरिक बनून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देण्याचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानदा क्लासेसचे संचालक प्रा. धिरज पवार यांनी केले. सौ. स्वाती पवार मॅडम यांनी पालकांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांचे मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांच्या यशामागील महत्त्वाचे घटक असल्याचे स्पष्ट केले.


कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कु. सुकेशनी सपकाळे व कु. मृणल पाटील यांनी केले, तर चि. शुभम पाटील यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.


