साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
1 min read

साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Loading

साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

अमळनेर प्रतिनिधी) :
ता. अमळनेर येथील जानवे गावातील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. समानता, न्याय आणि बंधुतेचा संदेश देणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाला अभिवादन करण्यासाठी ग्रामस्थ व वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात वाचनालयाचे अध्यक्ष श्री. डी. एम. पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या कार्याला अभिवादन केले.
या प्रसंगी अनिल पाटील, युवराज पाटील, नामदेव पाटील, मुरलीधर पाटील, पितांबर पाटील, अशोक वाल्हे, सुनील पाटील, राहुल पाटील, अशोक पाटील, देविदास पाटील आदी मान्यवरांसह वाचनालयाचे सदस्य व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रंथपाल श्री. विजय पाटील यांनी केले.
एकूणच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला असून, त्यांच्या विचारांची जोपासना करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *