अमळनेरात पहिल्यांदाच ‘आखाजी महोत्सव’! खान्देशी संस्कृतीचा भव्य जल्लोष , अहिराणी वाङ्मय दिनानिमित्त लोककला, स्पर्धा, गाणी आणि ग्रामीण परंपरांचा अनोखा संगम; १७ एप्रिल रोजी रंगणार सांस्कृतिक मेजवानी
1 min read

अमळनेरात पहिल्यांदाच ‘आखाजी महोत्सव’! खान्देशी संस्कृतीचा भव्य जल्लोष , अहिराणी वाङ्मय दिनानिमित्त लोककला, स्पर्धा, गाणी आणि ग्रामीण परंपरांचा अनोखा संगम; १७ एप्रिल रोजी रंगणार सांस्कृतिक मेजवानी

Loading

अमळनेरात पहिल्यांदाच ‘आखाजी महोत्सव’! खान्देशी संस्कृतीचा भव्य जल्लोष

अहिराणी वाङ्मय दिनानिमित्त लोककला, स्पर्धा, गाणी आणि ग्रामीण परंपरांचा अनोखा संगम; १७ एप्रिल रोजी रंगणार सांस्कृतिक मेजवानी

अमळनेर प्रतिनिधी
खान्देशातील सण-उत्सवांची समृद्ध परंपरा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ‘अक्षय्य तृतीया’ म्हणजेच आपली ” आखाजी’ ! हा केवळ सण नाही, तर आपल्या संस्कृतीचा कणा आहे. आखाजी हा दिवस अहिराणी वाङ्मय दिवस म्हणून साजरा केला जातो. हाच वारसा जपण्यासाठी आणि नवीन पिढीला आपल्या मुळांची ओळख करून देण्यासाठी, अमळनेर नगरीत पहिल्यांदाच खान्देश साहित्य संघाच्या वतीने १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता एल आय सी कॉलनी खुला भूखंड , लक्झरी बस स्टॉप समोर धुळे रोड अमळनेर येथे भव्य ‘आखाजी महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला खान्देशी लोककला, गाणी आणि परंपरांचे दर्शन घडणार आहे. विशेषतः महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी
विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे म्हणून अध्यक्ष
प्रा. डॉ. सदाशिव सुर्यवंशी
(केंद्रीय अध्यक्ष, खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र) तर उद्घाटक म्हणून
मा. राजेशजी पांडे
( प्रदेश सरचिटणीस, भाजपा) उपस्थित राहणार आहेत. आखाजी महोत्सवाचे
स्वागताध्यक्ष ,श्री. अशोक आधार पाटील
(सभापती, कृ.उ.बा.स.
अमळनेर) असतील तर ग्रामीण संस्कृती , आखाजी महोत्सव या विषयावर
प्रमुख वक्त्या
प्रा. डॉ. योगिता पाटील
(अहिराणी लेखिका, धुळे) प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.
हा आखाजी महोत्सव म्हणजे महिलांसाठी तर आनंदाची पर्वणी असेल. यावेळी खापर वरील पूर्ण पोळ्या बनवण्याची स्पर्धा , झोक्यावरील अहिराणी गीतांची स्पर्धा , गौराई च्या अहिराणी गाण्याची स्पर्धा , घट्यावरील गाण्याची स्पर्धा , वेशभूषा आणि एक मिनिटात उखाणे आदी स्पर्धा घेण्यात येणार असून प्रत्येक विजेत्याला अनुक्रमे गौराई आणि प्रथम ५ हजार ,द्वितीय ३ हजार , तृतीय २ हजार आणि प्रमाणपत्र बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अहिराणी शब्द व संस्कृती वाङ्मयावर चालता बोलता प्रश्न मंजुषा कार्यक्रम देखील होणार असून बक्षिसे दिले जातील. यासह ग्रामीण भागातील बचत गट अस्सल गावराणी खाद्य पदार्थ आणि वस्तूंचे विविध स्टॉल देखील लावणार आहेत.
या आनंदी महोत्सवास प्रमुख पाहुणे म्हणून
मा. खा. स्मिताताई उदय वाघ, (जळगांव लोकसभा), मा. आ. अनिल भाईदास पाटील, (माजी मंत्री, अमळनेर विधानसभा ) ,मा. कृषिभूषण साहेबराव पाटील, (माजी आमदार, अमळनेर ), मा. डॉ. बी. एस. पाटील, (माजी आमदार, अमळनेर विधानसभा ),मा. शिरीष हिरालाल चौधरी,( माजी आमदार, अमळनेर विधानसभा ) ,मा. डॉ. परीक्षित बाविस्कर, (लोकनियुक्त नगराध्यक्ष, अमळनेर ),मा. प्रशांत मनोहर निकम,( उपनगराध्यक्ष, अमळनेर नगरपरिषद) ,मा. अॅड. व्ही. आर. पाटील, (माजी जि. प. सदस्य, जळगाव ),मा. विक्रांत भास्करराव पाटील,( माजी नगरसेवक, अमळनेर) डॉ. अविनाश रघुराज जोशी,(अध्यक्ष, मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर ),डॉ. डिगंबर विठ्ठल महाले, (अध्यक्ष, मंगळग्रह मंदिर संस्थान, अमळनेर) मा. सचिन बाळू पाटील,(संचालक, कृ.उ.बा.स., अमळनेर ) ,(मा. अमेय प्रकाश मुंदडा, मुंदडा बिल्डर्स, अमळनेर) ,मा. सौ. रिता भुपेंद्र बाविस्कर, (प्रदेशाध्यक्ष, रा.काँ. ग्रंथालय विभाग ),मा. प्रविण गंगाराम पाटील ( राजू फापोरेकर), नगरसेवक, अमळनेर , मा. सचिन बळवंत पाटील,( नगरसेवक, अमळनेर), ज्ञानेश्वर धनगर (माजी तज्ज्ञ संचालक बाजार समिती, अमळनेर), जयेशकुमार काटे (संस्थापक अध्यक्ष शिवशाही फाउंडेशन, अमळनेर ) मा. प्राचार्य रत्नाताई पाटील, (खजिनदार, खान्देश साहित्य संघ, महा.),मा. रमेश आप्पा बोरसे, (सचिव, खान्देश साहित्य संघ, महा.) उपस्थित राहणार आहेत
खान्देश साहित्य संघाला नेहमीच मार्गदर्शक साहित्यिक
मा. श्री. कृष्णा आनंदा पाटील, (साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त),मा. श्री. सुभाष मोतीराम पाटील, (जेष्ठ साहित्यिक, मा. श्री. हिरामण अभिमन कंखरे, (जेष्ठ कवी), मा. श्री. गोकुळ गोविंदा बागुल, (अहिराणी साहित्यिक ),मा. श्री. शाहीर नाना पाटील, (अहिराणी साहित्यिक) मा. श्री. भाऊसाहेब देशमुख, (साहित्यिक) यांचे मार्गदर्शन असते.
या पत्रकार परिषदेस खान्देश साहित्य संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सदाशिव सूर्यवंशी, पू सानेगुरुजी शिक्षक साहित्य संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील ,कार्याध्यक्ष डॉ कुणाल पवार , साहित्य संघाचे जिल्हाध्यक्ष शरद धनगर ,कार्याध्यक्ष वाल्मिक मराठे, उपाध्यक्ष डी ए धनगर , सचिव उमेश काटे यांच्यासह साहित्य संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *