धरणगावात क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा !  द्विशताब्दी वर्षानिमित्त रांगोळी स्पर्धा व विद्यार्थिनींनी साकारली सावित्रीमाईंची वेशभूषा !
1 min read

धरणगावात क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा ! द्विशताब्दी वर्षानिमित्त रांगोळी स्पर्धा व विद्यार्थिनींनी साकारली सावित्रीमाईंची वेशभूषा !

Loading

धरणगावात क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा !

द्विशताब्दी वर्षानिमित्त रांगोळी स्पर्धा व विद्यार्थिनींनी साकारली सावित्रीमाईंची वेशभूषा !

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगाव : येथील सावता महाराज फुळमाळी समाज मोठा माळीवाडा व समस्त माळी समाज पंच मंडळ, लहान माळीवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचा १९९ व्या जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. शोभायात्रेची सुरुवात मोठा माळीवाडा समाज मंगल कार्यालयापासून फुलहार गल्ली, बाजोट चौक, जांजीबुवा गल्ली, गुरव गल्ली, बालाजी मंदिर, वाणी गल्ली, धरणी चौक, महात्मा फुले यांचे स्मारक, कोट बाजार, तेली विहीर, गबानंद चौक मार्गे संजय नगर येथे समारोप करण्यात आला. धरणी चौक येथील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण व पूजन मोठा माळीवाडा समाजाचे अध्यक्ष व्ही. टी. माळी सर व लहान माळीवाडा माळी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी मोठा माळीवाडा उपाध्यक्ष सोमनाथ महाजन, सचिव आर.डी.महाजन, सहसचिव विनायक महाजन, खजिनदार उमेश महाजन. लहान माळीवाडा पंच मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, विलास महाजन, सचिव दीपक रतिराम महाजन, खजिनदार राजेंद्र मांगो महाजन, यांच्यासह माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप महामंडलेश्वर भगवानदास महाराज, ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिरालाल महाराज, श्री संत कृपा वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नाना महाराज, उबाठा शिवसेना पक्षाचे उपनेते गुलाबराव वाघ, भाजपाचे मा. जिल्हा उपाध्यक्ष संजय महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबिसी सेल जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, भाजपचे दिलीप महाजन, मा. गटनेते कैलास माळी, याप्रसंगी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा लीलाताई सुरेश चौधरी, उपनगराध्यक्ष सुरेखा विजय महाजन, गटनेते निलेश चौधरी व विलास महाजन नगरसेवक लक्ष्मण महाजन, परमेश्वर महाजन, नगरसेविका रूपाली पवन महाजन, भारती हेमंत महाजन, प्रमिला आत्माराम शिरसाठ, कविता मच्छिंद्र पाटील, मीना भटू चौधरी, मंदाकिनी ललित येवले, ज्योती लक्ष्मण पाटील, प्रियंका चेतन जाधव, अक्काबाई रामा चव्हाण, अंजली भानुदास विसावे, हेमांगी किरण अग्निहोत्री, सोनाली भूषण कंखरे, यासोबत माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, प्रा. कविता महाजन, मनीषा महाजन, सुवर्णा महाजन, सुनंदा रमेश वाघ, कविता अमोल महाजन, वैशाली गुलाब महाजन, भाविका महाजन, वेणू प्रमोद पाटील तसेच सावित्रीमाईंच्या वेशभूषा साकारणाऱ्या व हातात महापुरुषांचे ग्रंथ असणाऱ्या महात्मा फुले हायस्कूलच्या विद्यार्थिनी सोनाक्षी चंडाले, खुशी भोई, हर्षाली करोसिया, मयुरी भोई, जया भोई, दिपाली भोई, दिव्या भोई, श्वेता भोई, रामेश्वरी चंडाले यांनी कार्यक्रमात शोभा आणली. शहरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नगरसेवक पप्पू भावे, भागवत चौधरी, नितीन गजाननसिंग बयस, सुनील पंढरीनाथ चौधरी, किशोर दौलत कंखरे, गुलाब नारायण मराठे, तौसीफ सलीम पटेल उपस्थित होते. यांच्यासोबत समाजाचे पदाधिकारी विठोबा नामदेव महाजन, बी. आर. माळी सर, निंबाजी महाजन, दशरथ महाजन, विजय महाजन, गोपाल महाजन, डिगंबर महाजन, तुळशीराम बापू, एस डब्ल्यू पाटील, सुकदेव आण्णा, पूनिलाल महाजन, अमोल सखाराम महाजन, पत्रकार रवींद्र महाजन, कडू रूपा महाजन, भगीरथ माळी सर, धर्मराज मोरे, बी.आर.महाजन सर, आबासाहेब वाघ, अविनाश बाविस्कर, विनोद रोकडे, पी डी पाटील सर, संतोष तायडे, गोरख देशमुख, एच डी माळी सर, वासुदेव महाजन, नरेंद्र पाटील, योगेश महाजन, बाळू महाजन, शांताराम महाजन, बापू महाजन, सोनू महाजन, निलेश महाजन, जितेंद्र महाजन, अनिल महाजन, रामचंद्र महाजन, पवन महाजन, बालू जाधव, कन्हैया महाजन, निवृत्ती महाजन, मच्छिंद्र पाटील, भीमराज पाटील, दिलीप पाटील, लक्ष्मण पाटील सर, चेतन जाधव व सर्व समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार समाजाचे सचिव आर डी महाजन सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनायक महाजन, नितेश महाजन, राजू महाजन, अमोल महाजन, बग्गीवाले शुभम महाजन व भूषण महाजन, कैलास महाजन, गणेश निकम, भोला महाजन, जयेश महाजन तसेच हनुमान नगर पासून ते संजय नगर पर्यंतचे सर्व युवक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. संजय नगर येथे समारोप प्रसंगी भगवा ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी केळी वाटप केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *