अमळनेरचा अभिमान! अर्जुन जोशी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाने चमकला
![]()
अमळनेरचा अभिमान! अर्जुन जोशी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाने चमकला
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील सेंट मेरी स्कूल चा इयत्ता सहावीतील विद्यार्थी व अर्जुन सायन्स अकॅडमी चा अभिमान असलेला चि. अर्जुन ज्ञानेश जोशी यांनी डॉ. होमी भाभा राज्यस्तरीय बालवैज्ञानिक स्पर्धा 25 –26 मध्ये सहभाग घेतला .मुंबईमध्ये दिनांक 12 एप्रिल रोजी झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात चि. अर्जुन जोशी यास नासिक विभागांतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. सुवर्णपदकाने मान्यवर अतिथींच्या हस्ते त्याला सन्मानित करण्यात आले.
विज्ञान विषयातील त्याची समज नियमित सराव मार्गदर्शक शिक्षिका व त्याची आई सौ सोनल जोशी मॅडम यांच्या मार्गदर्शनाने त्याने हे यश संपादन केले
अर्जुन सायन्स अकॅडमी मध्ये इयत्ता आठवी ते दहावी विज्ञान विषयाचे मार्गदर्शन दिले जाते. तसेच नेट सेट व जी या स्पर्धा परीक्षांसाठी फाउंडेशन बॅचेस नियमित सुरू असतात. त्याचा लाभ अर्जून ने घेतला सेंट मेरी इंग्लिश मीडियम हायस्कूल मुख्याध्यापिका व शिक्षकांचे त्यास मार्गदर्शन लाभले सेवानिवृत्त प्राध्यापक पी जे जोशी व.प्रा.डी एस लोहार यांचा तो नातू आहे ज्ञानेश व सौ. सोनल जोशी यांचा मुलगा आहे
या यशामुळे अमळनेर व परिसरात पालक व विद्यार्थ्यांकडून अर्जुन चे अभिनंदन केले जात आहे..

