रामभक्त हनुमान : निःस्वार्थ सेवाभावाचा महासागर”
1 min read

रामभक्त हनुमान : निःस्वार्थ सेवाभावाचा महासागर”

Loading

“रामभक्त हनुमान : निःस्वार्थ सेवाभावाचा महासागर”

हनुमान एकनिष्ठावंत भक्त ज्याने रामांच्या चरणी आपले उभं आयुष्य संपवलं.आज असं गाव खेड नसेल जिथ हनुमानाच मंदिर नसेल .याच कारण लोकांना कळत की,सच्चा भक्त देवाचा कोण आहे.हनुमान रामायनात आपल्याला एक गुणसंपन्न,सच्चा ,पवित्र निर्मळ मनाचा मधुर वाणी असलेला बलशाली देहयष्टी लाभलेला उंच पुरा अतिशय आकर्षक पुरूष .या बजरंगबलीला ना शरीराचा मोह ना स्व स्वार्थाचा लवलेस . त्याच घर कुटुंब या संदर्भात फारशी माहिती आपण घ्यावी असं ही आपल्याला वाटत नाही.हनुमान एक तेजपुंज स्वयंम प्रकाशीत व्यक्ती.रामांच्या भक्तीत सदैव लीन असणारे.अतिशय बिकट काळात फक्त रामांना तारण्याच काम हनुमान करतात असं नाही तर लव कुश यांना शरण जावून ते स्वतः ला बंदीस्त करुन घेतात.केव्हढी ही नम्रता लहान मुलांना एका साध्या कृतीने आपलंस करणारे महाबली मला खूप भावतात.सिता मातेला भेटताना त्यांची तहान भूक विसरुन हजारो मैलच ऊड्डान ध्येया प्रतिची ओढ अन् दिलेल्या जबाबदारी ची जाण भान याची प्रचिती येते.मला अप्रुक वाटत की,एक भक्त अगदी प्राणाची ही परवा न करता सोपवलेली जबाबदारी पार पाडतो.शब्दांचे भाव जानतो. देवाला स्वतः च्याहृदयात स्थान देतो. तिळमात्र स्वार्थ मनी न जोपासणारे मारुती.अनामिक नाते जोपासतात.म्हणुनच आज ही विवाह करणारा नवरदेव जेव्हा विवाह करतो त्या प्रत्यक्ष दिवशी तो पारावर जातो.या हनुमानाच्या चरणी नतमस्तक होतो व त्याला सांगतो आज पासून माझ्या जीवनात आलेल्या त्या अनोळखी मुलीवर अपार श्रद्धा,, प्रेम ,विश्वास, ठेविलच तिळमात्र जरी मनी शंका घेतली तर मी भस्म होईल.हे आपण जाणतो का? नाही मग जरा भानावर राहून मारुतीच्या मंदिरात जा…….. त्यांच्या हाती गदा आहे कारण काय?तर
“ग” म्हणजे गरजेतून नातैची जबाबदारी स्वीकारून,
गरजे पुरतेच वागणे,शरीर पाहूनच नातं निर्माण करणे व यातून जबाबदारी जोपासण नसावं
“दा”म्हणजे दातृत्वाचा मनी भाव जोपासन ,दारी आलेल्या याचकाला नेहमी मदत करणे ,होय.पण आजकाल तर एखाद्याच्या वेदनेची टिंगल टवाळ की केली जाते.गूणी असणारा व्यंगी व्यक्ती तर सर्रास विसरला जातो.त्याला वेदणेसह कोणी स्वीकारताच नाही.हनुमानाने गुणवान लोकांच्या मनाला सांभाळलं आज तर मन मारून जगणारे सगळीकडे मग व्यथा वेदना दुख दुसऱ्याच स्वीकारून त्याला साथ हात जीवनभर देण्यातची त खरी हिंमत कोणी ही करत नाही.मारुतीराय तुला सांगतो तुझ्यात जी हिंमत आहे ती जर आजकाल छटाक भर जरी व्यक्तीना लाभली असती तर ते गुणसंपन्न लोकांच्या पाठीशी आजीवन उभे राहून जीवनाचं सार्थक त्यांनी केल असत .जीवन त्यांच सार्थक झालं असत.मारुती राया तू कसा रे आज ही भुतं पिशाद पासून वाचवतो.खर का खोटं माहित नाही पण खरं सांगू तुझं नाव लोक अंधार खूप झाला संकट आलं किंवा एखाद्या जंगलात पडक्या वाड्यात जरी एकटे सापडले तरी तुझा जप करतात हनुमान चालीसा पठण करतात.एव्हढच काय तुझ्या नावाचा आसरा घेवून चित्रपट निर्मिती करुन महेश भट पोट भरत आहे.देवा एखादा व्यक्ती दिव्यांगावर प्रेम करतो तर ते फक्त तुझ्या आशीर्वाद नेच.तूला जसे राम प्रिय तसेच त्या दिव्यागाच्या मनात देव….अगदी तुझ्यासारखा भक्त तो देवाचा….

जय बजरंग बली
लेखक
मा.प्रकाश पाटील
यशपंढरी इंग्रजी क्लास संचालक लेखक
5 वी ते 12 वी प्रवेश देणे सुरु आहे.
९६६५१५७१५९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *