हनुमान जन्मोत्सव भक्तिभावात साजरा; संत गजानन महाराज मंदिरात पहाटेपासून धार्मिक कार्यक्रम,  स्तोत्र, आरती, पाळणा सोहळा आणि हरिनामाच्या गजरात भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग
1 min read

हनुमान जन्मोत्सव भक्तिभावात साजरा; संत गजानन महाराज मंदिरात पहाटेपासून धार्मिक कार्यक्रम, स्तोत्र, आरती, पाळणा सोहळा आणि हरिनामाच्या गजरात भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग

Loading

हनुमान जन्मोत्सव भक्तिभावात साजरा; संत गजानन महाराज मंदिरात पहाटेपासून धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

स्तोत्र, आरती, पाळणा सोहळा आणि हरिनामाच्या गजरात भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर येथील दादासाहेब जी. एम. सोनार नगर परिसरातील संत गजानन महाराज मंदिरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून विविध पूजाविधी, स्तोत्र पठण आणि पाळणा सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
सकाळी सहा वाजता हनुमान स्तोत्र पठणाने कार्यक्रमाची मंगल सुरुवात झाली. त्यानंतर भावपूर्ण आरती करण्यात आली. आकर्षक फुलांनी सजविण्यात आलेल्या पाळण्यात हनुमान जन्मोत्सवाचा पारंपरिक सोहळा पार पडला. “जय बजरंगबली”च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.
हनुमान जन्मोत्सवानिमित्त अभिषेक, रुद्रपठण, बिल्वपत्र अर्पण तसेच “ॐ नमः शिवाय”च्या अखंड जपाने वातावरण अधिकच पवित्र झाले. भक्तांनी हनुमानाच्या चरणी जलाभिषेक करत आपल्या मनोकामना व्यक्त केल्या. या प्रसंगी शिवभक्त आणि हनुमान भक्त एकत्र येत भक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.
या सोहळ्याला संत गजानन महाराज सेवा संस्थेच्या विश्वस्त तथा महिला वारी प्रमुख ज्योतीताई पवार, गजानन सेवा संस्थेचे अध्यक्ष आर. बी. पवार, अशोक भावे गुरुजी, नितीन भावे गुरुजी यांच्यासह गजानन परिवारातील महिला भगिनी व असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम भक्तिभाव, शिस्त आणि उत्साहात पार पडला. हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून उपस्थितांनी या दिव्य सोहळ्याचा मनसोक्त आनंद लुटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *