आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे,  अमळनेर तालुका शिवसेना बैठकीत मा.आ.शिरीषदादा चौधरी यांचे आवाहन.
1 min read

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, अमळनेर तालुका शिवसेना बैठकीत मा.आ.शिरीषदादा चौधरी यांचे आवाहन.

Loading

 

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे,

अमळनेर तालुका शिवसेना बैठकीत मा.आ.शिरीषदादा चौधरी यांचे आवाहन.

अमळनेर प्रतिनिधी
शिवसेना ग्रामीण कार्यकारणीची बैठक नुकतीच मा.आ. श्री. शिरीषदादा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये तालुकाप्रमुख गुलाब पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रथमेश पवार, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुरेश पाटील शहर प्रमुख विकास कंखरे यांचा सत्कार करण्यात आला.

बैठकीदरम्यान शिवसेना ग्रामीण कार्यकारणी विस्तारासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. जुन्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान राखत नव्या पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन लवकरच शिवसेना तालुका कार्यकारणी घोषित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत मा.आ. शिरीषदादा चौधरी यांच्या नेतृत्वामुळे अमळनेरमधील शिवसेनेला नवे बळ मिळाल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी तालुकाप्रमुख गुलाब पाटील विधानसभा क्षेत्रप्रमुख सुरेश पाटील, यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

मा.आ. शिरीषदादा चौधरी यांनी “गाव तिथे शाखा आणि प्रभाग तिथे शाखा” हा उपक्रम राबवून प्रत्येक शिवसैनिकाला बळ देण्याचा निर्धार व्यक्त केला व आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविण्याचा घोषणा करुन कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले. शेतकरी, कष्टकरी यांच्यावरील अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणे, गोरगरीबांच्या मदतीला धावून जाणे, लोकसंपर्क वाढवणे तसेच सदस्य नोंदणी व विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संघटन बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले. भविष्यात क्रियाशील शिवसैनिकांना उमेदवारी व पदांच्या माध्यमातून जबाबदारी देण्यात येईल.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित दादा पवार यांच्या दुःखद अपघाती निधन झाल्यामुळे तसेच हिरा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा स्व.काकासाहेब हिरालाल चौधरी यांच्या दुःखद निधनामुळे येत्या ४ एप्रिल ला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला, तरी त्यादिवशी कुणीही बॅनर, जाहिरात, बुके, भेटवस्तु इ. देऊ नये असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला किरण गोसावी (नगाव बु), एन आर ठाकरे (वावडे) शशिकांत पाटील, रवि पाटील (धार), जितु बापु, रावसाहेब कोळी, उत्तम वानखेडे (मांडळ), सुदाम चौधरी (शिरसाळे), पुरुषोत्तम चौधरी, संतोष चौधरी(पिंपळे), राजेंद्र पाटील (गळवाडे), चिंधा पाटील(एकलहरे), गजेंद्र जाधव (रामेश्वर), रामचंद्र पाटील (मुडी), जितेंद्र पाटील (आर्डी), परशुराम पाटील (कचरे), भुषण चौधरी(अमळगाव), भुषण पाटील, भरत पाटील(म्हसले), अविनाश पवार (पिळोदे), मयुर चौधरी(कळमसरे), भुषण कोळी (हिंगोणे खू प्र ज), प्रताप पारधी (आमोदे), दामोदर पाटील (नंदगाव), रोशन सोनवणे (दहिवद), यांच्यासह अनेक गावातील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *