गुरे-जनावरांच्या चोरीला बसला अटकाव, सीसीटीव्हीमुळे सुरक्षित झाला खवशी गाव!
1 min read

गुरे-जनावरांच्या चोरीला बसला अटकाव, सीसीटीव्हीमुळे सुरक्षित झाला खवशी गाव!

Loading

खवशी गावावर आता “तिसरा डोळ्याची” नजर.!

अमळनेर प्रतिनिधी (दिनकर पवार)

गेल्या दोन ते तीन वर्षापासून खवशी गावात अनेकदा जबरी व किरकोळ, गुरे , जनावरे चोऱ्यांची घटना घडत होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या घटना लक्षात घेऊन खवशी ग्रामपंचायत प्रशासनाने मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला. या योजनेअंतर्गत गावातील जिल्हा परिषद शाळेत तीन सीसीटीव्ही कॅमेरे व गावात प्रवेशद्वार ,बाहेरून येणारे रस्ते व गाव चौक, मरीआई चौक, फिरस्ती माता चौक, व तसेच मोठ्या प्रमाणावर चोरी होणाऱ्या रमाई नगर भागात आवश्यक त्या ठिकाणी दहा सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा बसवण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले जात आहे. या कामी प्रशासक आशा ताई अरुण गोसावी यांचे सहकार्य लाभले या कामी ग्राम सेविका सौ .रीना पवार यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *