लोकस्वातंत्र्य महिला सन्मान समारंभाचे पत्रकार महासंघाकडून दिमाखदार आयोजन*  ,*महिलांना पुरस्कार तथा सन्मानपत्र व साडीचोळीच्या गौरवासह २०० महिला सन्मानित,३५० ची उपस्थितीचा उत्स्फूर्त प्रतिसाद!*,  *लोकस्वातंत्र्य विश्वशक्ती गौरव पुरस्कार,गणेश वंदना आणि भारतामाता स्मृती समता प्रदर्शनीसह अभिनव आयोजन*
1 min read

लोकस्वातंत्र्य महिला सन्मान समारंभाचे पत्रकार महासंघाकडून दिमाखदार आयोजन* ,*महिलांना पुरस्कार तथा सन्मानपत्र व साडीचोळीच्या गौरवासह २०० महिला सन्मानित,३५० ची उपस्थितीचा उत्स्फूर्त प्रतिसाद!*, *लोकस्वातंत्र्य विश्वशक्ती गौरव पुरस्कार,गणेश वंदना आणि भारतामाता स्मृती समता प्रदर्शनीसह अभिनव आयोजन*

Loading

*लोकस्वातंत्र्य महिला सन्मान समारंभाचे पत्रकार महासंघाकडून दिमाखदार आयोजन*

*महिलांना पुरस्कार तथा सन्मानपत्र व साडीचोळीच्या गौरवासह २०० महिला सन्मानित,३५० ची उपस्थितीचा उत्स्फूर्त प्रतिसाद!*

*लोकस्वातंत्र्य विश्वशक्ती गौरव पुरस्कार,गणेश वंदना आणि भारतामाता स्मृती समता प्रदर्शनीसह अभिनव आयोजन*

अकोला प्रतिनिधी

“तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगणही ठेंगणे,तुझ्या विशाल पंखाखाली विश्व हे सारे वसावे” या वैश्विक संकल्पनेतून महिला शक्तीच्या उल्लेखनिय योगदानाला सकारात्मक प्रोत्साहन म्हणून गेल्या जागतिक महिला दिनाच्या औचित्त्याने लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून महिला सन्मान समारंभाचे आयोजन अकोला येथे करण्यात आले होते.याप्रसंगी विविध क्षेत्रातील अग्रेसर ३९ महिलांचा लोकस्वातंत्र्य विश्वशक्ती गौरव या राज्यस्तरीय महिला सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. उपस्थित १५० पेक्षा जास्त महिलांना दर्जेदार साडी चोळी व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.पत्रकार महासंघाचा मासिक ५५ वा विचारमंथन मेळावा आणि महिला सन्मानाच्या दिमाखदार आणि विलोभनिय भव्य दिव्य कार्यक्रमात महिला आणि पुरूषांची ३५० ची उपस्थिती म्हणजे.उत्स्फूर्त प्रतिसादाची एक पावती होती.

ज्येष्ठ साहित्यिक आणि शैक्षणिक व सामाजिक सेवाव्रती देवकाताई देशमुख यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षिका सिमाताई झावरे,राज्य अन्न आयोगाच्या सदस्या व समता परिषदेच्या विदर्भ विभागीय अध्यक्षा मायाताई ईरतकर,राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या राज्य पदाधिकारी मंदाताई देशमुख ह्या प्रमुख अतिथी म्हणून तर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.या प्रसंगी अपर्णा शिरिष धोत्रे,अर्चना श्रीकृष्ण शर्मा,पल्लवी दिवेकर,नितीशा कोठारी, डॉ.कल्याणी पवित्रकार,स्नेहल ढवळे,कल्पना देशमुख,प्रा‌.डॉ.दिपाली सोसे,वृंदा काटकर,राजश्री देशमुख,हेमाताई हुशे, डॉ शारदा अग्रवाल व डॉ.प्रतिक्षा देशमुख (खामगाव)अंशुल गुप्ता,कल्याणी मुटे (किर्तनकार हिंगणघाट)पिंकी हिरानंदानी,सुमय्या अली,नयना सरोदे,वंदना पिंपळखरे,व विविध क्षेत्रातील ईतर अग्रेसर महिलांचा “लोकस्वातंत्र्य विश्वशक्ती गौरव” या राज्यस्तरीय महिला सन्मान पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.स्मृतीचिन्ह,शाल,साडी चोळी व पुष्पगुच्छ असे त्याचे स्वरूप होते.सौ.अर्चना पुष्पराज गावंडे ,सौ.प्रतिभा प्रदिप खाडे यांचेसह उपस्थित १५० पेक्षा जास्त महिलांना सन्मानपत्र व साडी चोळी देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी श्री साहेबराव तायडे यांची भारतमाता समता स्मृती शिल्पांची प्रदर्शनी,आरंभीची तृप्ती बोंते यांच्या विद्यार्थीनी दृष्टी इंगोले आणि …सरकटे या मुलींची नृत्य गणेश वंदना,स्वागत गीत विनायक पांडे यांचा शंखनाद,अशा आयोजनांनी हा कार्यक्रम विलोभनिय ठरला.महिलावर्गातील अनेकींनी सत्कारानंतर आनंद व्यक्त करीत त्याचवेळी हृदयस्पर्शी प्रतिक्रिया व्यक्त करीत कौतुकासह लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाप्रती शुभेच्छा व्यक्त केल्या.

सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,गाडगे बाबा व महापुरूषांना वंदन अभिवादन करण्यात आले.शहिद जवान,महिला,दिवंगत पत्रकार,शेतकरी व अपघात, आपत्तींमधील दुर्दैवी बळींना यावेळी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
सौ.जया भारती यांचे संचलनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला उपाध्यक्ष प्रदिप खाडे,सचिव राजेन्द्र देशमुख,पुष्पराज गावंडे,सिध्देश्वर देशमुख,गिरधारीलाल सारडा (वाशिम)संदिप देशमुख,निशाली पंचगाम,पंजाबराव देशमुख, डॉ.नितीश अग्रवाल,रामराव देशमुख, (खामगाव)किशोर मुटे,(हिंगणघाट)डॉ.शंकरराव सांगळे,अंबादास तल्हार,महादेव लूले,अमरावती जिल्हा ग्रामीण अध्यक्ष महेन्द्र काळे,रमेश समुद्रे,अमित इंगळे,दिपक शिरसाट,संघपाल शिरसाट,गजानन थोरात,डॉ.विनय दांदळे,सुरेश पाचकवडे,नारायणराव अंधारे,प्रा.मोहन वाघ,अशोक शिरसाट,अॕड राजेश कराळे,ॲॕड नितीन धुत,प्रा.विजय काटे,वाशिम जिल्हाध्यक्ष शिवशंकर भोयर,अकोला जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर,सागर लोडम,मनोहर मोहोड व ईतर पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सो.जया भारती,दिपाली बाहेकर,दिलीप नवले,पंजाबराव वर,सतिश देशमुख,श्रीकृष्ण माळी,आशिष वानखडे,मोहोड,व अनेकांनी परीश्रम घेतले.आभार प्रदर्शन किर्ती मिश्रा यांनी केले.सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली‌.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *