दिपक उखर्डु वाल्हे यांना प्रेरणा फाऊंडेशन बदलापूरचा भारत गौरव पुरस्काराने सन्मानित*
![]()
*दिपक उखर्डु वाल्हे यांना प्रेरणा फाऊंडेशन बदलापूरचा भारत गौरव पुरस्काराने सन्मानित*
*अमळनेर* येथील सामाजिक कार्यकर्ते तथा डेबुजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालयाचे संंस्थापक अध्यक्ष लाँन्डी व्यावसायिक दिपक उखर्डु वाल्हे हे गेल्या 22 – 23 वर्षांपासून करित असलेल्या सामाजिक कार्य व त्यांनी राबविलेले विविध क्षेत्रातील उपक्रम व कोरोना काळातील उपक्रमांची दखल घेऊन *प्रेरणा फाऊंडेशन बदलापूरचा 8 व्या वर्धापन दिनानिमित्त* दिला जाणारा यंदाचा *भारत गौरव पुरस्कार 2026* हा पुरस्कार
यांच्या शुभहस्ते बदलापुर येथे त्यांच्या अनुपस्थितीत त्याचे मार्गदर्शिका ताईसाहेब प्रा.डॉ. रंजनीताई लुंगसे यांनी पुरस्कार स्विकारला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. संजीव जैन (चीफ इन्फार्मेशन ऑफिसर) मा. अविनाश म्हात्रे ( अध्यक्ष कुष्ठरोग दिनदयाळ संस्था ) मा. श्री. धनाजी पवार ( सुप्रसिध्द समाज सेवक ) मा. श्री. मोहन कदम (सुप्रसिध्द समाजसेवक पत्रकार )मा. सौ. माधुरी भोईरकर ( प्रसिध्द समाज सेविका ) मा.श्री. रघुनाथ फडके ( प्रसिध्द गायक जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य) मा. श्री. लोकशाहीर भीमराव ठोंगिरे
( प्रसिध्द लोकशाहीर ) आणि मा. श्री. राजेश भांगे ( प्रसिध्द उद्योजक ) मा.श्री अनिल शिंदे ( कार्याध्यक्ष नॅशनल धोबी महासंघ) मा.श्री कृष्णा शिंदे ( कार्याध्यक्ष लाँन्डी व्यावसायिक संघटना धोबी समाज )
आदी प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते
आतापर्यंत दिपक वाल्हे यांना राष्ट्रीय राज्यस्तरीय विभागीय जिल्हास्तरीय पुरस्कार तसेच कोरोना काळात केलेल्या विविध उपक्रमाबद्दल कोरोना योद्धा पुरस्कार असे आतापर्यंत 54 पुरस्कार प्राप्त झाले आहे
दिपक वाल्हेनी पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की
आजपर्यंत आपण सर्वांनी केलेल्या सहकार्यानेच शक्य झाले. प्रेरणा फाऊंडेशन बदलापूर व आपल्या सर्वाचाच आभारी आहे. पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी वाढते अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते अर्थात काम करताना अनेक अडचणी येतात पण पुन्हा अशा पुरस्काराने नव्याने काम करण्याच्या उत्साह निर्माण होतो पुरस्काराने मला प्रेरणा मिळेल व भविष्यात देखील नवनवीन उपक्रम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल

