पोदार लर्न स्कूलचा उपक्रम ठरणार खास ,  ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते आज होणार बक्षीस वितरण
1 min read

पोदार लर्न स्कूलचा उपक्रम ठरणार खास , ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते आज होणार बक्षीस वितरण

Loading

पोदार लर्न स्कूलचा उपक्रम ठरणार खास

ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते आज होणार बक्षीस वितरण

अमळनेर प्रतिनिधी : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नुकतेच उद्घाटन झालेल्या येथील गलवाडे रोडवरील पोदार लर्न स्कूलने सामाजिक जाणिवेचे भान राखत विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. तसेच इंग्रजी माध्यमाच्या या शाळेची यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रियाही
सुरू झाली आहे.
शनिवार, दि. २८ मार्च रोजी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यात गट क्रमांक १ (नर्सरी ते इयत्ता १ ली) साठी रंगभरण स्पर्धा, तर गट क्रमांक २ (इयत्ता २ रीते ५ वी) साठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यास सायकल,

महिलांना मिळणार आज नथ, छल्ला, पैठणी जिंकण्याची संधी
रविवार, दि. २९ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता महिलांसाठी आयोजित ‘मी आई जिजाऊ’ या विषयावरील वेशभूषा स्पर्धेत उत्कृष्ट वेशभूषा सादर करणाऱ्यांमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्या निवडण्यात येणार आहेत. प्रथम पारितोषिक सोन्याची नथ, द्वितीय चांदीचा छल्ला, तर तृतीय पारितोषिक म्हणून पैठणी दिली जाणार आहे. स्पर्धा आटोपल्यानंतर सायंकाळी दोन्ही दिवस झालेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार आहे. या सोहळ्यास अमळनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन पोदार लर्न स्कूलच्या चेअरमन सौ. अर्चनाताई सूर्यवंशी, संचालक प्रशांत सूर्यवंशी व पी. आर. वाघ यांनी केले आहे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *