भारत सरकार , मेरा युवा भारत जिल्हा स्तरीय खो खो स्पर्धेत डी आर कन्या शाळेचे घवघवीत यश “….
![]()
“भारत सरकार , मेरा युवा भारत जिल्हा स्तरीय खो खो स्पर्धेत डी आर कन्या शाळेचे घवघवीत यश “….
अमळनेर…भारत सरकार युवा कार्यक्रम आणि क्रीडा मत्रांलय यांच्या तर्फे आयोजित मेरा युवा भारत जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा जळगाव येथील एकलव्य क्रीडा संकुल एम जे काॕलेज येथील मैदानावर आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील अनेक नामवंत संघानी सहभाग घेतला. सेमी फायनल मध्ये जळगाव संघाचा दारुन पराभव करुन अंतिम , सामन्यात डी आर कन्या संघाने सहभाग निश्चित केला.अंतिम सामना रावेर संघाविरुध्द अंत्यंत चुरशीच्या सामन्यांत एक गुंणानी विजय निसटला. या स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करणारा अमळनेरचा खा.शि मं च्या श्रीमती द्रौ. रा कन्या शाळा अमळनेर संघास मान्यवरांच्या हस्ते मानाचा मोठा चषक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या संघानी चषक मिळविल्याबद्दल शालेय समिती चेअरमन व समन्वय समिती चेअरमन भाऊसो श्री योगेशजी मुंदडे यांच्या शुभ हस्ते बुके व सुवर्ण पदक देऊन संपुर्ण टिम चे अभिनंदन करुन सत्कांर करण्यात आला.
तसेच कर्णधार वैभवी खंबायते , जान्हवी पाटील ,भारती कोळी , वैष्णवी पाटील ,गार्गी सांळुखे ह्या खेळाडूना उत्कृष्ठ संरक्षक , आक्रमक अश्या पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
वरील यशस्वी प्राविण्याबद्दल खा.शि मं कार्याध्यक्ष सीए श्री नीरजभाऊ अग्रवाल , कार्येपाध्यक्ष श्री जितेंद्र भाऊ जैन , संचालक श्री डाॕ संदेश गुजराथी , जेष्ठसंचालक श्री हरी भिका वाणी , संचालक श्री भाऊसो प्रदीप अग्रवाल , संचालक श्री राकेश मुंदडे ,संचालिका सौ लिनाताई पाटील , सर्व संचालक मंडळ , मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी , उपमुख्याध्यापिका श्रीमती एस पी बाविस्कर , पर्यवेक्षक श्री एस पी वाघ , जेष्ठ शिक्षक एस एस माळी , एस एस वाघ यांनी सर्व खेळांडुचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
वरील खेळाडूना क्रीडा विभाग प्रमुख आर एस सोनवणे , के आर बाविस्कर यांनी अमुल्य मार्गदर्शन केले.

