युवासेनेची नवी कार्यकारणी जाहीर; अमळनेरात तरुण नेतृत्वाला मोठी संधी
1 min read

युवासेनेची नवी कार्यकारणी जाहीर; अमळनेरात तरुण नेतृत्वाला मोठी संधी

Loading

युवासेनेची नवी कार्यकारणी जाहीर; अमळनेरात तरुण नेतृत्वाला मोठी संधी

अमळनेर प्रतिनिधी : वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व संसदरत्न खा.श्रीकांतजी शिंदे साहेब, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक, युवासेना सचिव किरण साळी यांच्या आदेशाने युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा यांनी युवासेनेची नूतन कार्यकारणी जाहीर केली असून तालुका प्रमुख पदी राहुल भास्कर कंजर, विधानसभा क्षेत्र प्रमुख पदी पंकज संतोष शेटे, शहर प्रमुख प्रविण पुरुषोत्तम पाटील, उपशहरप्रमुख करण सुपडू चव्हाण, शेख अल्ताप राजा फारुख, तुषार महेंद्र सोनार, शहर संघटक राकेश रविंद्र लांडगे, उपशहर संघटक यश मोहन साळुंखे, कॉलेज कक्ष प्रमुख शंतनु शामकांत भावसार, कॉलेज कक्ष सचिव गौरव रविंद्र पाटील, सोशल मीडिया प्रमुख पदी खेमचंद सुर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे युवासेना जिल्हाप्रमुखांच्या सहीचे पत्र कार्यालयातून प्राप्त झाले.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी आमदार शिरीषदादा चौधरी, आ. किशोर आप्पा पाटील, आ. अमोल दादा पाटील, आ. चंद्रकांत अण्णा सोनवणे, आ. चंद्रकांत भाऊ पाटील, मा. खा. उन्मेश दादा पाटील, जिल्हाप्रमुख वासुदेव भाऊ पाटील, महिला आघाडीच्या विभागीय प्रमुख सरिता ताई माळी तसेच नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर, शिवसेना तालुका प्रमुख गुलाब पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रथमेश पवार, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुरेश पाटील, शहर प्रमुख भरत पवार, विलास कंखरे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

युवा कार्यकर्त्यांची निवड झाल्याने पुन्हा एकदा नवमतदार पक्ष व संघटने सोबत जोडला जाईल व एक तरुण कार्यकर्त्यांची फळी युवासेनेचे माध्यमातुन तयार होईल शिवसेना तालुका प्रमुख गुलाब पाटील यांनी सांगितले. इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या निवडीचे स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *