त्रिवेणी महिला मंडळाचा महिला दिन उत्साहात साजरा सत्कार, स्पर्धा व मनोरंजन कार्यक्रमांनी रंगली महिलांची मैफल
![]()
त्रिवेणी महिला मंडळाचा महिला दिन उत्साहात साजरा
सत्कार, स्पर्धा व मनोरंजन कार्यक्रमांनी रंगली महिलांची मैफल
अमळनेर प्रतिनिधी :
त्रिवेणी महिला मंडळ, अमळनेर यांच्या वतीने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज गार्डन येथे उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात घरासाठी हातभार लावणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.शि. मंडळाच्या उपाध्यक्ष श्रीमती माधुरी प्रमोद पाटील या होत्या. त्यांनी महिला दिनानिमित्त मंडळातील महिलांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. महिलांच्या योगदानाचे कौतुक करत त्यांनी महिलांनी समाजात अधिक सक्रिय भूमिका बजावावी, असे प्रतिपादन केले.
यावेळी नगरसेविका सपना पाटील, सरला शिंपी, मनीषा शेंठे, उज्वला मालपुरे, अल्का ताई गिरी, मंजुषा शिरोडे, लताताई दुसाने, शितल ठाकूर, पूजा वाणी, चित्रा शिरोडे, वासंतीताई, संगिता गुजराथी, माया सोनार, कल्पना पाटील, विद्या पाटील आदींचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात मनोरंजनपर विविध खेळ तसेच बेस्ट वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये प्रथम क्रमांक शितल ठाकूर, द्वितीय अल्का गिरी यांनी मिळविला. बेस्ट ड्रेस स्पर्धेत मनीषा नेरकर, शितल ठाकूर, संगिता गुजराती, रेखा बागुल, नीता ढेरे, कल्पना पाटील, सीमा सेठिया, सुनिता सेठिया यांनी बाजी मारली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या संचालिका विद्या शहा, अध्यक्षा मिनाक्षी देशमुख, उपाध्यक्षा नेहा देशपांडे तसेच हेमा पुरकर, निशा दुसाने, अर्चना शहा, गायत्री सराफ, उज्वला अमृतकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. या सर्वांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन संचालिका श्रीमती सुरेखा सराफ यांच्या सौजन्याने करण्यात आले. शेवटी उपस्थितांना नाश्ता व आईस्क्रीम देण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप माधुरी पाटील यांनी आभार प्रदर्शनाने झाला.


