अमळनेरात श्रीराम जन्मोत्सवाचा भक्तीमय जल्लोष; संत गजानन महाराज मंदिरात भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती
1 min read

अमळनेरात श्रीराम जन्मोत्सवाचा भक्तीमय जल्लोष; संत गजानन महाराज मंदिरात भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती

Loading

अमळनेरात श्रीराम जन्मोत्सवाचा भक्तीमय जल्लोष; संत गजानन महाराज मंदिरात भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर येथील दादासाहेब सोनार नगर परिसरातील संत गजानन महाराज मंदिरात श्रीराम जन्मोत्सव अत्यंत भक्तीभाव, उत्साह आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. संपूर्ण मंदिर परिसर “जय श्रीराम”च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी संत गजानन महाराज सेवा संस्थानच्या विश्वस्त ज्योतीताई पवार यांच्या हस्ते अभिषेकाने झाली. त्यानंतर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांची मालिकाच पार पडली. दुपारी श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रामरक्षा पठण, स्तोत्र माळजप आणि पाळणा सोहळा यांचे आयोजन करण्यात आले होते.
विशेष म्हणजे या कार्यक्रमात महिला भगिनींचा सहभाग लक्षणीय होता. संत गजानन महाराज मंदिरातील गजानन परिवारातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी भक्तिरसात रंग भरला. त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच आध्यात्मिक उंची लाभली.
शेवटी सर्वांनी एकत्रित आरती करून श्रीरामचरणी भक्तिभाव अर्पण केला. त्यानंतर प्रसाद वितरण करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व भक्तीमय वातावरणात पार पडला.
या प्रसंगी गजानन परिवारातील महिला भगिनी व बंधू मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीराम जन्मोत्सवाचा आनंद घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *