अमळनेरमध्ये खान्देश रक्षक फाउंडेशनकडून पाणपोईचा शुभारंभ; नागरिकांना दिलासा
1 min read

अमळनेरमध्ये खान्देश रक्षक फाउंडेशनकडून पाणपोईचा शुभारंभ; नागरिकांना दिलासा

Loading

अमळनेरमध्ये खान्देश रक्षक फाउंडेशनकडून पाणपोईचा शुभारंभ; नागरिकांना दिलासा

अमळनेर प्रतिनिधी – वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आणि प्रभू श्रीराम नवमी तसेच जळगाव लोकसभेच्या खासदार मा. स्मिताताई वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त, अमळनेर शहरात आजी-माजी सैनिकांच्या खान्देश रक्षक फाउंडेशनतर्फे पाणपोई उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या पाणपोईचे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना शुद्ध व थंड जारमधील पाणी उपलब्ध करून देण्यात येत असून, सुरक्षा रक्षकाच्या देखरेखीखाली पाणी वाटप केले जात आहे. या उपक्रमाचा लाभ ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शेतकरी बांधव तसेच गरजू नागरिक मोठ्या प्रमाणात घेत आहेत.
पाणपोईचे उद्घाटन अमळनेर नगरपालिकेचे माजी नगरसेवक व माजी सैनिक श्री. सचिन बळवंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. नगरसेवक प्रताप आबा छबुलाल साळी, श्री. चंदूसिंह नाना परदेशी यांच्यासह खान्देश रक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष विजय सूर्यवंशी, शहराध्यक्ष धनराज पाटील, माजी सैनिक शिवदास शेटे, रामकृष्ण पाटील, जयदीप राजपूत, प्रवीण पाटील, अंकुश पाटील, रोकडे सर, प्रकाश परदेशी, अकील शेख तसेच अनेक आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *