अमळनेरमध्ये उदया श्री भगवान स्वामीनारायण प्रागट्योत्सवाचा भव्य सोहळा
1 min read

अमळनेरमध्ये उदया श्री भगवान स्वामीनारायण प्रागट्योत्सवाचा भव्य सोहळा

Loading

अमळनेरमध्ये उदया श्री भगवान स्वामीनारायण प्रागट्योत्सवाचा भव्य सोहळा

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर येथील स्वामीनारायण मंदिरात सनातन धर्माचे महान ज्योतीर्धर, पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री स्वामीनारायण यांचा प्रागट्योत्सव तसेच श्रीराम नवमी जयंती निमित्त उदया दि. 26 मार्च रोजी गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने सकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान प्रभात फेरी काढण्यात येणार असून भक्तिमय वातावरणात भगवानाचे नामस्मरण करण्यात येईल. दुपारी 12 वाजता श्रीराम भगवानांची महाआरती होणार आहे. तसेच रात्री 8 ते 10 या वेळेत भगवान स्वामीनारायण प्रागट्योत्सवानिमित्त भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेमध्ये भगवंताची धुन, प्रार्थना, कीर्तन व प्रवचन अशा विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांना भक्तीमय वातावरणाचा अनुभव घेता येणार आहे.
या पवित्र जन्मोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पूज्य योगी स्नेह स्वामी व पूज्य अखंड मुनि स्वामी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *