पाचोरा तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांचे फिजिओथेरपी शिबीर संपन्न*
1 min read

पाचोरा तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांचे फिजिओथेरपी शिबीर संपन्न*

Loading

 

*पाचोरा तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांचे फिजिओथेरपी शिबीर संपन्न*

 

पाचोरा प्रतिनिधी

पाचोरा येथील गट साधन केंद्र शिक्षण विभाग पंचायत समिती पाचोरा तर्फे समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीर फिजिओथेरपीस्ट डॉ.चेतन पाटील यांच्या हेल्थ पाॅईंट फिजिओथेरपी धन्वंतरी क्लिनिक अँड रिहॅब सेंटर पाचोरा येथे घेण्यात आले.
फिजिओथेरपी शिबिराचे उदघाटन विजय पवार गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पाचोरा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ.चेतन पाटील व डॉ . राहुल पाटील फिजियोथेरेपिस्ट व त्यांची टिम ,पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते .केंद्रस्तरीय सर्व विशेष शिक्षक यांनी संपूर्ण शिबीराचे नियोजन केले. विशेष शिक्षक लहू पवार यांनी प्रास्ताविक केले.शिबिरासाठी तालुक्यातील सर्व केंद्रातील विविध शाळांमधील जवळपास 45 विद्यार्थी पालकांसह उपस्थित होते. शिबीरात डॉ.चेतन पाटील सरांमार्फत 45 विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी सेवा देण्यात आली,तसेच पालकांना थेरपी , इतर वर्तन समस्या,व उपाययोजना यावर मार्गदर्शन करण्यात आले.गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकून राहण्यासाठी आवश्यक सहकार्य शिक्षण विभागातर्फे सातत्याने करण्यात येत असल्याचे सांगितले.
विशेष शिक्षक प्रकाश पाटील, लहू पवार,रावसाहेब साळुंखे, दिलीप पाटील ,घन:शाम चौधरी , सुवर्णा पाटील,संगीता देसले, कैलास बडगुजर,सिमा पाटील, प्रज्ञा आराध्ये,जयदिप पाटील, सोनाली शेवरे या सर्व विशेष शिक्षकांनी कामकाज पाहिले. आभार सिमा पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *